सुदानमध्ये यूएन शांतता प्रस्थापित करण्याच्या उपक्रमाचा(“पीसकीपिंग मिशन) एक भाग म्हणून तैनात भारतीय सैनिक आणि चिनी सैन्या यांच्यामध्ये रस्सी खेच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सहभागी जिंकलेल्या भारतीय सैनिकांच्या जल्लोष करतानाच्या व्हिडिओने भारतीयांचे मन जिंकले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याने मैत्रीपूर्ण सामन्यात विजय मिळवताना दाखवले आहे.
हा व्हिडीओ भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेला असून एएनआय या वृत्तसंस्थने एक्सवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये भारत आणि चीन देशाच्या सैनिकांमध्ये रस्सीखेचचा सामना रंगला आहे. दोन्ही देशाचे सैनिक जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. अखेर पूर्ण ताकदपणाला लावून भारतीय सैनिक ही स्पर्धा जिंकतात. मोठ्या जल्लोषात आणि टाळ्यांच्या कडकडाटात भारतीय सैनिक विजय साजरा करतात. व्हिडिओमध्ये चिनी सैनिक आपल्या देशाचे झेंडे फडकावत असताना एक माणूस ढोल वाजवताना दिसत आहे.
एक्सवर व्हिडिओ शेअर करताना एएनआय या वृत्तसंस्थेने लिहिले आहे की, “ संयुक्त राष्ट्र शांतता अभियानांतर्गत भारतीय सैन्याला सुदान आफ्रिकेत तैनात करण्यात आले आहे. दरम्यान भारतीय सैन्य आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या रस्सी खेच स्पर्धेमध्ये त्यांनी विजय मिळवला: सैन्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली.”
हेही वाचा – “बापरे… बाप!” आसाममधील घराच्या बाथरूममध्ये आढळले ३५ हून अधिक जिवंत साप, अंगावर काटा आणणारा Video Viral
व्हिडीओ एक्सवर २८ मे रोजी शेअर करण्यात आला असून आतापर्यंत २, ६७,००० लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. भारतीय सैनिंका जल्लोष आणि उत्साह पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले, “शांतता अभिनयासाठी भारताने सर्वोत्तम सैनिकांना पाठवले आहे. ” दुसरा म्हणाला, “आम्हाला भारतीय सैन्यांचा अभिमान वाटतो”
तिसरा म्हणाला, “आमच्या सैनिकांचा आम्हाला अभिमान वाटतो. मला वाटते की चिनी सैनिकांना भारताच्या सामर्थ्याशी आणि पराक्रमाशी संबंधित एक संकेत मिळाला आहे. छान!!”
२९ मे रोजी UN शांतीरक्षक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन आहे. या प्रसंगी, लष्कराच्या सार्वजनिक माहितीच्या अतिरिक्त महासंचालनालयाच्या अधिकृत हँडलने जगभरात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचा मॉन्टेज व्हिडिओ शेअर केला. “#UNPeacekeepersDay च्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त, #IndianArmy UN शांती मिशनमध्ये सेवा करणाऱ्या सर्व शांति रक्षकांच्या समर्पण आणि धैर्याला सलाम केला आणि ज्यांनी शांततेसाठी आपले प्राण अर्पण केले त्यांना श्रद्धांजली वाहते,” असे त्यात लिहिले आहे.
१९४८मध्ये जेव्हा सुरक्षा परिषदेने मध्यपूर्वेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षकांना तैनात करण्यास अधिकृत केले तेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानाला सुरुवात झाली. तेव्हापासून, UN द्वारे ७० हून अधिक शांतता अभियान तैनात केले गेले आहेत.