सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात ज्यापैकी काही अत्यंत अविश्वसनीय असतात काही खळबळजनक असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये एका विमानातून उडी मारून स्काय डायव्हिंग करणारा सिंह दिसत आहे. एक व्यक्ती सिंहाच्या पाठीवर बसलेली दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहे. व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सिंहाचा आकाशात उडण्याचा व्हिडिओ तुफान झाला व्हायरल आहे. व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. पण हा व्हिडिओ खरा आहे का खोटा असा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे.
व्हायरल व्हिडिओ खरा स्टंट आहे की, आणखी एक अगदी खरा वाटणारा एआय निर्मिती? travelling.shillong या इन्स्टाग्राम पेजने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सिंह एका माणसाबरोबर स्कायडायव्हिंग करताना दिसतो. हा प्राणी अत्यंत शांतपणे सर्व दृश्य पाहत आहे. तो हवेत तरंगत आहे, उंच विमानातून खाली कोसळत आहे तरी त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भिती दिसत नाही. तो सर्व दृश्य आश्चर्याने पहात आहे.
एका आठवड्यात २० लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्याने, हा व्हिडिओ सर्व प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय बनला आहे. परंतु केवळ कौतुकाच्या कारणांमुळे नाही. अनेक वापरकर्त्यांनी लगेचच असे निदर्शनास आणून दिले की काहीतरी चुकीचे आहे. सिंहाच्या स्थिर मानेपासून ते चेहऱ्यावरील हावभावांपर्यंत, शंका उपस्थित होऊ लागल्या. अनेकांनी असा प्रश्न विचारला की, असा धोकादायक पराक्रम कसा केला जाऊ शकतो आणि त्याहूनही महत्त्वाचे, हे का करेल कोणी?
व्हिडिओच्या अगदी खरा वाटेल असा असलेल्या या व्हिडीओमुळे ऑनलाइन वादविवाद सुरू झाला आहे, काही लोकांना खात्री आहे की, तो एआय-जनरेटेड आहे, तर काहींना अजूनही खात्री नाही. एका वापरकर्त्याने विनोद केला, “फक्त एक प्रश्न – तू त्याला कसे पटवलेस,” तर दुसऱ्याने लिहिले, “आता, भाऊ जंगलांवर राज्य करण्याचा खरोखर कंटाळा आला आहे, त्याला आकाशाचे मालक व्हायचे आहे.”
आणखी एकाच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिंह विचार करत असेल,”निचे जेन दे फिर बटाटा हू (खाली जाऊ दे मग सांगतो)” पण विनोद बाजूला ठेवून, अनेकांनी प्रेक्षकांना खऱ्या आणि कृत्रिमतेमध्ये फरक करता येत नाही याबद्दल चिंता व्यक्त केली. “हे एआय-जनरेटेड म्हणून ओळखू न शकणार्या लोकांची संख्या चिंताजनक आहे,” असे एका वापरकर्त्याने लिहिले.
व्हिडिओ डिजिटल पद्धतीने तयार केला आहे असे गृहीत धरूनही, या कंटेंटने लक्ष वेधण्यासाठी निर्माते काय काय करू शकतात यावर वाद निर्माण केला.
एकाने म्हटले, “किमान त्याला हेल्मेट तरी द्या, कदाचित तो श्वास घेऊ शकत नाही.” चिंता फक्त दृश्यां पुरती मर्यादित नव्हती. काही वापरकर्त्यांनी व्हायरल कंटेंट निर्मितीमध्ये नैतिकतेचा मोठा मुद्दा उपस्थित केला, विशेषतः जेव्हा त्यात वन्य प्राण्यांचा समावेश असेल, खरा आहे की नाही. सध्या तरी, व्हिडिओ खरा आहे की एआय-जनरेटेड आहे याची कोणतीही पुष्टी नाही.