Wedding bride dance video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहेत.

वास्तविक, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवी नवरी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तेथे उपस्थित महिलाही थक्क झाल्या आहेत. साधारणपणे नवीन नवरी या शैलीत दिसत नाहीत. सासरच्या घरी ती सुरुवातीला लाजाळू असते. मात्र, या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी नवरी जराही न लाजता बेभान नाचत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही नवरी आपल्या नवऱ्यासाठी हा डान्स करत आहे. “तेरे हात मे है जो मेहेंदी बस नाम उसीका लेंदी” या गाण्यावर ही नवरी भर मांडवात नवरदेवासमोर डान्स करत आहे. यावेळी पाहुणे मंडळीही या नवरीला पाहतच राहिले आहेत. तर नवरदेव तर लाजून लाल झाला आहे. तुम्हीच पाहा व्हिडीओमध्ये नवरदेवाची रिअ‍ॅक्शन..

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दोन गावच्या महिला आमने-सामने अन् चक्क शिव्यांच्या भडीमार; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर marathi_royal_karbhar या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी या व्हिडीओला “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” असं कॅप्शन लिहलं आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”.