गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारी जोर धरला. सोमवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर काही भागात मंगळवारी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल, लोअर परळ, शीव, धारावी, वांद्रे, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, काळाचौकी, अंधेरी, दहिसर, बोरिवली, गोरेगाव, सांताक्रूझ यासह अनेक ठिकाणी पाणी साचले.

मुंबईतील पावसाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास पावसाने काहीशी विश्रांती घेतली आणि साचलेले पाणी ओसरायला सुरुवात झाली. मात्र, सकाळी पुन्हा पाऊस बरसू लागला आणि शाळा-महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. ऑफिसला जाणारे लोक पावसापासून वाचण्यासाठी प्लॅटफॉर्म आणि ब्रिजवर आसरा शोधात होते. दरम्यान, या परिस्थितीत असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

लहानग्या कुत्र्याचा गोंडस बंड पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’

या व्हिडीओमध्ये प्लॅटफॉर्मवरील एका ब्रिजवरून चालणारे लोक आपण पाहू शकतो. त्यांच्याकडे बघून बाहेर जोराचा पाऊस पडत असावा असे वाटते. ब्रिजवर चालत असताना पावसापासून आपला बचाव होतो. असे असताना देखील ब्रिजवरून जातानाही अनेक लोक छत्री उघडून चालत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसतंय. लोक किती आळशी असतात हे यावरून दिसून येतंय. हा मजेदार व्हिडीओ दादरमुंबईकर या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आपले हसू आवरता येत नाही आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर, पुढील २४ तासांत मुंबईत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज कुलाबा केंद्रातून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, सोमवारी रात्री मुंबईत मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली.