मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निकालानुसार भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये एकतर्फी विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मध्य प्रदेशात भाजपाने ज्या प्रकारे पुनरागमन केले आहे, त्यावरून शिवराजसिंह चौहान हेच ​​आजही जनतेची पहिली पसंती असल्याचे मानले जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात होताच कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण आपापली मतं मांडत असतो आणि निकालाचे विश्लेषण करत असतो. याच निवडणुकीचा भविष्यवाणीमुळे काही लोकांनी बक्कळ पैसे देखील कमावले आहेत. हो कारण काही लोकांनी आपल्या आवडीनुसार पक्ष आणि उमेदवारांवर पैज लावली होती. या पैजेतून छिंदवाडा जिल्ह्यातील नीरज मालवीय याने तब्बल एक लाख रुपये जिंकले आहेत.

हेही पाहा – “देश देख रहा है, एक अकेला…” भाजपाच्या विजयानंतर सोशल मीडियावर PM मोदींचा ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक स्टॅम्प पेपरचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन जणांनी भाजपा आणि काँग्रेस यापैकी कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार यावर १ लाखाची पैज लावल्याचं पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यासाठी या लोकांनी ५० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर ५ साक्षीदारांसह ही पैज लावली आहे. प्रतिज्ञापत्रात एकाने काँग्रेस आणि दुसऱ्याने भाजपा राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे.

हेही पाहा- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींचा ‘तो’ जुना VIDEO व्हायरल, भाजपाचे नेते म्हणतायत, “राहुलजींची भविष्यवाणी…”

२२ नोव्हेंबर रोजी छिंदवाडा जिल्ह्यातील नीरज मालवीय आणि धनीराम भलावी यांच्यात १ लाख रुपयांची पैज लागली होती. माजी सरपंच असलेल्या भालवी यांना मध्य प्रदेशात काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल असा विश्वास होता, तर नीरज मालवीय नावाच्या व्यक्तीने भाजपा सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. व्हायरल प्रतिज्ञापत्रात नीरज मालवीय आणि धनीराम भलावी यांनी चेकवर सह्या करून तो स्टॅम पेपर साक्षीदार अमित पांडे यांच्याकडे जमा केल्याचं दिसत आहे. अटींनुसार, दोघांमध्ये जो विजयी होईल त्याला अमित पांडेकडून चेक मिळणार असा ठराव करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता नीरज नावाच्या व्यक्तीने ही पैज जिंकली असून या स्टॅम पेपरचा फोटो एक्स (ट्विटर) वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय नेटकरी या फोटोच्या खाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचंही पाहायला मिळत आहे. तसेच निवडणुकीच्या निकालामुळे एका व्यक्तीने लाख रुपय कमावल्याच्या प्रकरणाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे.