Woman Chia Pet Toilet Video Viral : हौसेला मोल नाही हे म्हणतात ते काही खोटं नाही, लोक आपली हौस पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसतात. अशाचप्रकारे एका तरुणीने आपली हटके हौस पूर्ण करण्यासाठी बाथरुममध्ये असं काही केलं की पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या तरुणीने बाथरुममध्ये जागोजागी फक्त चिया सीड्सची रोपं लावून ठेवली आहेत, त्यामुळे अनेकांनी, अरे ही वेडी तर झाली नाही ना असे म्हटले आहे. तर अनेकांना प्रश्न पडला आहे की, तरुणीने बाथरुममध्ये असं नेमकं का केलं असेल.

बाथरुम कमी आणि गार्डन अधिक

या तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तुम्हाला दिसेल की, तिने बाथरुममधील बाथ टबपासून सिंक स्लॅब ते अगदी टॉयलेट सीटपर्यंत सगळीकडे चिया सीड्सच्या बिया पेरल्या आहेत. यानंतर तिने या सगळीकडे पेरलेल्या चिया सीड्सना ६ ते ७ दिवस नियमित पाणी दिले. ती रोज कशाप्रकारे या बियांवर पाण्याची फवारणी करत होती तेही व्हिडीओत दाखवले आहे. अखेर या सीड्समधून ७ दिवसांनी छोटी रोपं खुलतात. यामुळे ते बाथरुम कमी आणि गार्डन अधिक दिसत होतं. कारण सगळं बाथरुम चिया सीड्सच्या रोपांमुळे हिरवंगार दिसत होतं. पण, तरुणी इथपर्यंतच थांबली नाही, तिने चक्क खास चिया सीड्सच्या रोपांपासून नखं बनवली होती. तरुणीचा हा वेडेपणा पाहून युजर्सही चकित झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे काय आहे अगं? कोण असं करतं?” युजर्सचा सवाल

अनेकांनी तरुणीचा हा उपद्रव निरर्थक असल्याचे म्हटले आहे, तर अनेकांनी त्यावर विनोद केला आहे. तरुणीने हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, एका आठवड्यापूर्वी मी बाथरुममध्ये चिया सीड्स पेरल्या होत्या आणि आज.. पूर्णपणे तिथे चिया स्पा तयार झाला आहे. हा व्हिडीओ @growithjessie नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, प्रार्थना करतो, या तरुणीकडे दुसरे बाथरुम असेल. दुसऱ्या युजरने लिहिले की, हे काय आहे अगं? कोण असं करतं? अनेकांनी तरुणीचा हा निव्वळ वेडेपणा असल्याचे म्हटले आहे; तर काहींनी लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात असे म्हटलेय.