Woman Made Newspaper Saree Video Viral : चित्रविचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आणि एन्फ्लुएंसर उर्फी जावेद तुम्हाला माहीतच असेल. अतरंगी स्टाइलमधील तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील तुफान व्हायरल होत असतात. अनेक जण तिच्या हटके स्टाइलचं कौतुक करतात, तर काही जण तिला प्रचंड ट्रोल करतात. मात्र, उर्फीला अशा लोकांचा काहीच फरक पडत नाही. लोकांनी तिच्यावर कितीही टीका केली तरीही उर्फीने अतरंगी स्टाईल करणं सोडलं नाही. पण, सध्या सोशल मीडियावर एक एन्फ्लुएंसर तरुणी चक्क उर्फीला टक्कर देताना दिसत आहे. या तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात तिने चक्क न्यूज पेपरपासून बनवलेली साडी नेसलेली दिसतेय.

न्यूज पेपर साडीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

न्यूज पेपरपासून साडी हे वाचताना तुम्हाला विचित्र वाटेल, पण त्या तरुणीने प्रत्यक्षात अशी साडी बनवून चक्क नेसली आहे. विश्वास बसत नसेल तर तुम्ही व्हायरल व्हिडीओ एकदा पाहिलाच पाहिजे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

व्हायरल व्हिडीओत दिसतेय की, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून सहावारी साडी बनवली आहे, फक्त बनवली नाही तर तिने ती चक्क पदर, निऱ्या काढून चापून चोपून नेसलीदेखील आहे; त्यामुळे व्हिडीओ पाहताना तुम्हालाही काही वेळ विश्वास बसणार नाही की ती खरंच न्यूज पेपरची साडी आहे. तरुणीने न्यूज पेपरची साडी नेसून अनेक फोटोदेखील काढले आहेत. आत्तापर्यंत आपण साडीवर न्यूज पेपरची प्रिंट, बातमीची प्रिंट केलेली पाहिली असेल, पण या तरुणीने चक्क न्यूज पेपरपासूनच साडी बनवल्याने पाहून सर्वच चकित झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

artbeats_diary नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साडीचा हा क्रिएटिव्ह व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तरुणीच्या क्रिएटिव्हीटाला सलाम केलाय, तर अनेकांनी ही साडी चुकूनही उर्फी जावेदला दाखवू नकोस, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, तरुणीची साडीची क्रिएटिव्हीटी तुम्हाला कशी वाटली, आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा.