Accused Attempt To Rape Women In moving Train: मुंबई लोकलमध्ये सीएसटी ते मस्जिद दरम्यान एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तरुणाने एका ३२ वर्षीय महिलेवर धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे समजतेय. सदर महिलेने आरडाओरडा करताच या तरुणाने महिलेच्या कुटुंबियांसह धक्कादायक कृत्य केले आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील मुज्जफरपूरमधून गुजरात येथे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये घडली असून याबाबत सध्या तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक (ग्वाल्हेर) राजेश चंदेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडितेला फ्रॅक्चर झाले आहे. तर तिच्याबरोबरच्या एका पुरुष नातेवाईकाला सुद्धा किरकोळ दुखापत झाली आहे. पीडित महिला झारखंडमध्ये रोजंदारीचे काम करते. एका पुरुष प्रवाशासह ती सुरतला जात होती. प्रवासात पाच जणांच्या गटाने तिचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली होती, पीडितेने आक्षेप घेत त्यांना विरोध केला. आपल्याबरोबरचा पुरुष प्रवासी हा आपला नवरा आहे आणि जर ते पाच जण थांबले नाहीत तर त्याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा दिला . जेव्हा तिने त्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला तेव्हा ग्रुप सदस्यांनी तिची साडी ओढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी महिला आणि तिच्या नातेवाईकाला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ग्वाल्हेर आणि गुना दरम्यानच्या बदोरी रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाजवळ बेशुद्धावस्थेतील दोन व्यक्ती आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.आरोपींची ओळख पटवण्यासाठी अधिकारी मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशन आणि लखनऊ येथील सीसीटीव्ही फुटेज शोधत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे.
हे ही वाचा<< आधी तरुणीची भररस्त्यात हत्या, आता पेरले भूसुरुंग; हिंसाचाराने मणिपूर वादात, पण आता खरं काय पाहाच
इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली त्यानंतर पीडित महिलेसह तिच्या नातेवाईकांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 354 (महिलेवर तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला किंवा बळजबरी) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.