Delhi Metro: दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटनांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या ट्रेनमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात. मेट्रोचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. जिथे लोक मेट्रोमध्ये विचित्र गोष्टी करत असतात. लोक कधी सीटसाठी भांडत असतात, तर कधी भांडणाला काहीच कारण लागत नाही. दरम्यान दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.दिल्ली मेट्रोमध्ये एक अशी घोषणा झाली की सगळेच हसू लागले.याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

मेट्रोमध्ये अचानक झाली ‘ही’ अनाऊंसमेंट

मेट्रोमध्ये अचानक झालेल्या अनाऊंसमेंटमध्ये खासकरून अविवाहित प्रवाशांना टार्गेट करण्यात आलं आहे. आता तुम्ही म्हणाल अशी काय अनाऊंसमेंट केली. तर या अनाऊंसमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे, “प्रवाशांना विनंती आहे की, कृपया मेट्रोमध्ये नाच गाणे करु नये, जर तुम्ही लाईफ पार्टनर शोधत असाल तर जीवनसाथी डॉट कॉमवर या आणि वरातीत नाचण्याची संधी घ्या.” दरम्यान ही घोषणा ऐकताच मेट्रोमध्ये एकच हशा पिकला.Jeevansathi.com ने प्रमोशनचा करण्यासाठी हा अनोखा मार्ग अवलंबला आहे. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक अनोखा अनुभव होता, जो ते कधीच विसरणार नाहीत.

मेट्रोचा प्रवास हा बऱ्याच जणांना सोयीस्कर वाटतो, त्यामुळे मेट्रो शहरातील लोक बहुतांशी मेट्रोने प्रवास करणे पसंत करतात. बऱ्याच अंशी मेट्रोही सुरक्षित मानली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून लोक मेट्रोमध्ये विचित्र स्टंट, अश्लिल डान्स यांसारखे प्रकार करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पायाने पीठ मळून घेतले आणि नंतर टॉयलेट क्लिनर मिसळले; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ viralbhayani नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरवर कमेंट करताना त्याने लिहिले, ‘मेट्रो असुरक्षित वाटत आहे. तर दुसरा म्हणतो ‘असे विचित्र व्हिडिओ फक्त दिल्ली मेट्रोतच होऊ शकतात’. ‘दिल्ली मेट्रोत काय होईल याचा भरोसा नाही’, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.