scorecardresearch

सापांचे असे दृश्य तुम्ही कधीही पाहिले नसेल; ‘हा’ Viral Video बघून तुमच्याही अंगावर येईल काटा

सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून एकतर आपण आश्चर्यचकित होतो किंवा ते पाहिल्यानंतर आपल्याला प्रचंड भीती वाटते.

You have never seen such a scene of a snake
सापांच्या प्रजातींमध्ये किंग कोब्रा हा सर्वात धोकादायक साप मानला जातो. (Photo : Instagram/@snake._.world)

साप पाहून भल्याभल्यांची हालत बिघडते. सापाला आपल्या आजूबाजूला रेंगाळताना पाहणे एका भयानक स्वप्नापेक्षा कमी नाही. या पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापांचा समावेश होतो. साप पाहून माणसांबरोबरच प्राण्यांचीही अवस्था दयनीय होते. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगर आणि साप अत्यंत धोकादायक मानले जातात. या पृथ्वीतलावर असे काही साप आढळतात, जे अतिशय विषारी आहेत. जर हे साप चावले तर काही क्षणातच समोरच्याचा मृत्यू होऊ शकतो.

सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून एकतर आपण आश्चर्यचकित होतो किंवा ते पाहिल्यानंतर आपल्याला प्रचंड भीती वाटते. सापांच्या प्रजातींमध्ये किंग कोब्रा हा सर्वात धोकादायक साप मानला जातो. जर हा साप एखाद्याला एकदा चावला तर तो व्यक्ती जिवंत राहणे अशक्य आहे. सोशल मीडियावर सध्या एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. जे तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल. या व्हिडीओमध्ये अनेक किंग कोब्रा एकाच फांदीवर एकत्र बसलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ असा आहे की, तो पाहिल्यानंतर कुणालाही आश्चर्य वाटेल. असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

डोकं नसणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या काय आहे या Viral Photo मागील सत्यता

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की झाडाच्या पातळ फांदीवर अनेक किंग कोब्रा साप एकमेकांमध्ये अडकलेले दिसत आहेत. त्या लहानश्या फांदीवर जागा मिळवण्यासाठी ते धडपड करताना दिसत आहेत. त्यातील एक साप तर अतिशय रागात दिसत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर snake._.world नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून या व्हिडीओला भरपूर लाइक्सही येत आहेत. लोक या व्हिडीओवर खूप कमेंट करत आहेत. कारण सापाचे असे दृश्य प्रत्येकासाठी आश्चर्यचकित करणारे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: You have never seen such a scene of a snake you will be shocked after watching this viral video pvp

ताज्या बातम्या