Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करताना दिसून येतात. हल्ली काही लोकं सार्वजानिक ठिकाणी डान्स करायला घाबरत नाही आणि बिनधास्त डान्स करतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लोकलमध्ये तर कधी रेल्वे स्टेशनवर, कधी रोडवर तर कधी मेट्रोमध्ये, लोकं आवडीने डान्स शूट करतात आणि सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चालत्या रेल्वेच्या डब्यातील आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वेच्या डब्यात पोरा-पोरी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. रेल्वेच्या डब्यात जागा खूप कमी असते. अशात या मुलामुलींनी खूप छान डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना या मुलामुलींचा डान्स पाहून त्यांच्या तरुणपणाची आठवण येईल तर काहींना त्यांच्या मित्रमैत्रीणींबरोबर घालवलेल्या क्षणांची आठवण येईल.

हा व्हायरल व्हिडीओ एका चालत्या ट्रेनमधील आहे. एका ट्रेनच्या डब्यात काही तरुण मुलं-मुली डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल.व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एक मुलगा त्यानंतर एक मुलगी अशा क्रमाने सहा जण डान्स करत आहे. त्यांच्या अतरंगी डान्स पाहून तुम्हाला डान्स करावासा वाटू शकतो. या रेल्वेच्या डब्यात बसलेले काही प्रवासी आवडीने त्यांचा डान्स बघत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : VIDEO : बापरे! शाळेत खेळताना विद्यार्थ्यांना दिसला भलामोठा अजगर, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

raghu_abc_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तिरुपती अट्रोसिटीज” कॅप्शनवरुन कळते की ही ट्रेन तिरुपती जात असावी.. या व्हिडीओवर अनेक युजर्नसी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स केलाय. पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो.” तर एका युजरने लिहिलेय, “काळ्या रंगाच टि शर्ट घातलेल्या मुलीने खूप छान डान्स केला आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम, मित्रांची आठवण आली.”