Video : २६/११ दहशदवादी हल्ला; IPS विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला ताज हॉटेलमधील थरारक अनुभव

२६ नोव्हेंबर २००८… हा दिवस म्हणजे मुंबईसाठी ठरलेला काळा दिवस. ताज हॉटेलवर झालेल्या या हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली.

Vishwas Nangare Patil
IPS विश्वास नांगरे पाटील हे या हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमधील दहशदवाद्यांना रोखण्यासाठी लढा देणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक होते.

२६/११ हा दिवस मुंबईसाठी ठरलेला काळा दिवस आहे. याच दिवशी मुंबईवर १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईवर चाल केली. या हल्ल्यामुळे मुंबईसह संपूर्ण देश हादरला होता. भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर झालेला हा हल्ला भयावह होता. IPS विश्वास नांगरे पाटील हे या हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमधील दहशदवाद्यांना रोखण्यासाठी लढा देणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. विश्वास नांगरे पाटील यांनी या दिवशीचा थरारक अनुभव लोकसत्ता डॉट कॉम कडे सांगितला आहे. पाहुयात या हल्ल्याबद्दल IPS विश्वास नांगरे पाटील काय सांगतात…

२६/११च्या दहशदवादी हल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, नरीमन हाऊस, लियोपोल्ड कॅफे, ताज हॉटेल आणि टॉवर, ऑबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल आणि कामा हॉस्पिटलला दहशतवाद्यांनी आपलं लक्ष केलं. १६६ लोकांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. तर कित्येकजण जखमी झाले होते. तब्बल ६० तास दहशतवाद्यांशी सामना करून, आपल्या प्राणांची परवा न करता आपले शूर जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हजारो निष्पापांचे प्राण वाचवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 26 11 attack ips vishwas nangre patil shared a thrilling experience pvp

ताज्या बातम्या