दिल्लीला लागून असलेल्या नोएडामधील सेक्टर-21 येथील जलवायू विहारमध्ये एका सोसायटीची भिंत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

टनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. भिंतीलगत असलेल्या नाल्याच्या साफसफाईचे काम सुरू होते, त्यात मजूर गुंतले असताना अचानक भिंत कोसळली. दुर्घटनेनंतर जेसीबी मशिनच्या सहाय्याने ढिगारा हटवला जात असून, अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले जात आहे. तर, अन्य ९ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचावकार्यात गुंतले आहे. या अपघातात दोन ते तीन मजूर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज (२० सप्टेंबर) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोएडाचे डीएम सुहास एलवाई म्हणाले, “नोएडाच्या सेक्टर 21A मध्ये असलेल्या जलवायू विहारमध्ये भिंत कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखी चार मजूर अडकल्याची भीती असल्याने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.