उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र यादव असे या व्यक्तीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – अण्णा हजारेंनी मद्यधोरणावरून खरमरीत पत्र लिहिल्यानंतर केजरीवाल यांचं मोठं विधान, म्हणाले…

सुरेंद्र यादव याने यांनी सोमवारी ट्विटरवर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही बाब निदर्शनास येताच अखिल भारतीय क्षत्रीय मंचचे प्रभारी ब्रिजेश सिंह यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीस अधिकारी पन्नेलाल यांनी दिली आहे.

हेही वाचा – कमी गुण दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकालाच झाडाला बांधून केली मारहाण! शिक्षक म्हणतात, “त्यांनी आम्हाला…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी एका युवकाला अट करण्यात आली होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर शाहपूर सिरपुरा गावातील एका युवकाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या युवकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती.