वसई- ईडीचा अधिकारी असल्याचे सांगून वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार मघ्ये राहणारे प्रशांत राऊत हे बहुजन विकास आघाडीचे नेते असून वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन येत होता. किशाोर अंबावकर असे त्याने आपले नाव सांगितले होते. मी  ईडीचा अधिकारी असल्याचे सांगून ईडीचा समेमीरा टाळण्यासाठी १ कोटींची मागणी केली. सुरवातीला राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वारंवार ही व्यक्ती फोन करून ईडी आणि सीबीआयची धमकी देत पैशांची मागणी करत होता.

हेही वाचा >>> वसई विरार : काल केली स्वच्छता, आज पुन्हा कचरा, स्वच्छता मोहीम संपताच ये रे माझ्या मागल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवार ३० सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास त्यांना किशाोर अंबावकर नावाच्या व्यक्तीने फोन केला. मला बॅंक ऑफ इंडियाजवळ १ कोटी रुपये आणून दे अन्यथा ईडी, आयकर आणि सीबीआयची चौकशी मागे लावेन अशी धमकी दिली. या प्रकरणी राऊत यांनी सोमवारी रात्री विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संबंधित मोबाईल धारकाविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी या व्यक्तीला ओळखत नाही. मागील तीन महिन्यांपासून तो मला धमकी देत होता. त्यामुळे मी पोलिसात तक्रार दाखल केली असे प्रशांत राऊत यांनी सांगितले. या मागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.