नालासोपारा पूर्वेच्या वाकणपाडा येथे रामा इंडस्ट्रीमधील एलईडी तयार होत असलेल्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा- वीजगळती कमी करण्यासाठी महावितरणची उपाययोजना; गत वर्षीच्या तुलनेत गळती दोन टक्क्यांनी कमी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नालासोपारा पूर्वेच्या वाकणपाडा येथील रामा इंडस्ट्री असून यात अवधूत आश्रम येथे एलईडी तयार करण्याचा कारखाना आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे या कारखान्यात आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या आगीची माहिती स्थानिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली असून घटना स्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून
आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीचे लोळ उसळत आहेत. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागले याचे कारण समजू शकले नाही.