भाईंदर : भाईंदरच्या स्मशानभूमीत पाळीव मांजरीवर अंत्यविधी करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर, स्मशानभूमी कर्मचाऱ्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकऱणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून शहरात वाद निर्माण झाला होता.

भाईंदर पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमीत एका पाळीव मांजरीवर अंत्यविधी करण्यात येत असल्याची चित्रफीत काही दिवसांपूर्वी वायरल झाली होती. हे काम ‘पेट हेवन्स’ नामक एक संस्था पैसे घेऊन करत असल्याचे समोर आले होते. या कामात या संस्थेला महापालिकेच्या स्मशानभूमितील कर्मचारी मदत करत होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. हिंदूंच्या स्मशानभूमीत प्राण्यांचे दहन होत असल्याने भावना दुखावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा : वसई : पालिका मुख्यालयाचे उद्घाटन लांबणीवर, फर्निचर आणि साहित्य गंजू लागले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात पालिका उपायुक्त रवी पवार यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार चित्रफीतमध्ये दिसत असलेले संस्थेचे पदाधिकारी जितेश पटेल आणि पारुल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यांना मदत करणारे पालिका कर्मचारी बबन धुळे, हनुमान चव्हाण, मिरज अली आणि निलेश पाटील यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात कलम २९७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे यांनी दिली.