वसई : नायगाव पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेला एक आरोपी पोलीस ठाण्यातूनच फरार झाला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. नायगाव पोलिसांनी फसवणूकीच्या गुन्ह्यात मोहम्मद सिकतायन (५२) या आरोपीला सोमवारी अटक केली होती. नायगाव पोलीस ठाण्यात पोलीस कोठडी नसल्याने आरोपी सिकतायन याला वसई पोलीस ठाण्यात ठेवण्यात येणार होते.
हेही वाचा : वसई: पापडखिंड धरणात छट पूजा, पाणी प्रदूषीत
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता सुरू होती. रात्री पावणे नऊच्या सुमारास तो पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातूनच फरार झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. मोहम्मद सिकतायन (५२) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ३ गुन्हे दाखल आहेत.