वसई : नालासोपारा पूर्वेच्या सेवालाल नगर येथील चाळीत सोमवारी पहाटे ८ ते १० घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला तर एका घरात घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटून नेण्यात आले आहे. यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज गावातील सेवालाल नगर येथे सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. येथे एकमजली चाळी आहे. पहाटे लोकं साखरझोपेत असतांना भुरट्या चोरांनी अनेक घराती कडी कोयंडे तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि एक लाखाचा ऐवज ललुटण्यात यश आले. एकाच वेळी अनेक घरात चोरीचा प्रयत्न झाल्याने येथील नागरिक भयभीत झाले होते.

हेही वाचा : ट्रक दुचाकी अपघातात दुचाकी चालक जागीच ठार, विरार पूर्वेच्या पारोळ फाटा येथील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. आम्ही वरच्या मजल्यावर झोपायला गेलो असताना खालच्या खोलीत शिरलेल्या अज्ञात चोरांनी आमचे दागिन आणि रोख रक्कम लुटून नेली, अशी तक्रार लक्ष्मी पटवा या महिलेने दिली आहे. या परिसरात नशेबाजांचा वावर वाढला आहे. अमली पदार्थांचे व्यवहार होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं येत असतात. त्यामुळे गुन्हेगारी टोळीने रेकी करून एकाच वेळी अनेक घरे फोडण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती शिवसेना (ठाकरेगट) स्थानिक पदाधिकारी विनायक पवार यांनी दिली. इतर घरांमध्ये चोरी झालेली नाही. फक्त एका घरात चोरीची घटना घडली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.