जगदीश तांडेल

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या जवळ अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर अत्याधुनिक द्रोणागिरी शहर विकसित होत आहे. जल मार्गाने जोडलेले तसेच शिवडी न्हावा सागरी सेतूमुळे मुंबईला गोवा व पुण्याच्या प्रवासातील हे अंतर कमी करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आंतरराष्ट्रीय शहराच्या यादीत समाविष्ट होणाऱ्या या द्रोणागिरी शहराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
heavy traffic on manor wada bhiwandi state highway closed due to crack in bridge near manor
पालघर: मनोर वाडा अवजड वाहतूक बंद; टेन जवळील पुलाच्या सुरक्षिततेबद्दल शंका

उरण ते सी एस एम टी लोकल एप्रिल महिन्यात उरण ते सी एस एम टी   (मुंबई) ही लोकल सेवा सुरू होत आहे.  त्यामुळे द्रोणागिरी शहर हे मुंबईचे नवे व सर्वात कमी अंतरावरील उपनगर होणार आहे. तर २०२३ च्या डिसेंबर पर्यंत शिवडी ते न्हावा शेवा सागरी पुलामुळे द्रोणागिरी ते मुंबई हे रस्ते मार्गाने वीस मिनिटांच्या अंतरात पार करता येणार आहे. मुंबईत ज्याप्रमाणे दक्षिण मुंबई भागाचं महत्त्व आहे तसंच महत्त्व दक्षिण नवी मुंबईला भविष्यात प्राप्त होणार आहे. आज जे लोक द्रोणागिरी, उरण परिसरात गुंतवणूक करतील, त्यांना उद्या परताव्यासह इतरही अनेक फायदे मिळतील.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, एमटीएचएल, दिल्ली-जेएनपीटी फ्रेट कॉरिडॉर, विरार-वसई- अलिबाग कॉरिडॉर, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबई- पुणे-नाशिक आदी रिंगरूट कनेक्टिव्हिटी प्रकल्प यांमुळे द्रोणागिरी परिसरातल्या विकासाला वेग येईल. परिणामी नेरूळ-उरण पट्टय़ात पट्टा औद्योगिक, व्यावसायिक आणि गृहनिर्माणाचं देशातलं मोठं आणि या बंदरामुळे इथे सेवाक्षेत्रही विस्तारत महत्त्वाचं केंद्र म्हणून ओळखलं जाणार आहे.

न्हावाशेवा शिवडी सी-लिंकमुळे दक्षिण नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई एकमेकांपासून काही मिनिटांच्या अंतरावर येईल. भविष्यात द्रोणागिरी परिसराचं वाढणारं महत्त्व लक्षात घेता या नोडमधल्या घरांच्या किमती हळूहळू वाढत असल्या तरी इथे सिडकोतर्फे बांधण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांमुळे सर्वसामान्यांना मोठा परिसरातला द्रोणागिरी नोड उत्तम पर्याय ठरू पाहत आहे. भविष्यात सिडकोद्वारे दक्षिण नवी मुंबईत देखील परवडणाऱ्या घरांच्या संधी उपलब्ध होणार असून, परवडणाऱ्या घरांसाठी  दोणागिरी नोड महत्त्वाचे ठरेल.

न्हावाशेवा-शिवडी सी -लिंक नवी मुंबईच्याच विकासाचा एक भाग म्हणून १९७० पासून उरणमधील विकासाला सुरुवात झाली आहे. उरण हे अरबी समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील मासेमारी व भातशेती हा येथील प्रमुख व्यवसाय होता; परंतु ७० च्या दशकात मुंबईपासून २५० किलोमीटर अंतरावर समुद्रात कच्च्या तेलाच्या विहिरींचा शोध लागला. या शोधानंतर या कच्च्या तेलावर प्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ओएनजीसीच्या तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला गेला. १९७५ पासून सुरू करण्यात आलेल्या या तेलशुद्धी प्रकल्पातून वायू, डिझेल, घरगुती गॅस, केरोसीन, नाफ्ता आदीचा पुरवठा केला जात आहे. मागील तीन वर्षांपासून या प्रकल्पाच्या पुनर्बाधणीचे ७ हजार कोटी रुपयांचे काम सुरू आहे. त्यामुळे ही नव्याने गुंतवणूक केली जात आहे. याच प्रकल्पावर आधारित देशातील पहिला वायूवर चालणारा पहिला वायू विद्युत प्रकल्पही उभारण्यात आला. या प्रकल्पातून ९५२ मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे, तर या प्रकल्पामुळे येथील नागरिकांनाही रोजगार मिळालेला आहे. त्याच धर्तीवर भारत पेट्रोलियमचा घरगुती गॅस भरणा प्रकल्प उभारला गेला आहे.

सध्या या प्रकल्पातून देशभरात घरगुती गॅसचा पुरवठा केला जात आहे. १९९० च्या दशकात सुरू झालेल्या या प्रकल्पाचाही विस्तार करण्यात आला आहे, तर १९८९ ला उरणमधील औद्योगिकीकरणात जेएनपीटी बंदराच्या उभारणीमुळे यात भर पडली. जेएनपीटी बंदराच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या बंदर उद्योगाची वाढ सध्या वेगाने सुरू आहे. बंदरातील वाढत्या कंटेनर हाताळणीबरोबरच बंदरातील मालाची चढ-उतार करण्यासाठी लागणाऱ्या गोदामांची संख्याही वाढू लागली आहे. यात अधिकृत व अनधिकृत असे मिळून २०० पेक्षा अधिक गोदाम तयार झाले आहेत. या गोदामातील कामामुळेही रोजगार वाढू लागले आहेत. येथील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळेही पसरू लागले आहे. जेएनपीटी तसेच येथील उद्योग परिसराला जोडणारे दोन्ही मार्ग हे राष्ट्रीय महामार्ग बनले आहेत. जेएनपीटी ते गव्हाणदरम्यान सहापदरी तर त्यानंतर आठपदरी असे हे मार्ग पूर्ण झाले आहेत. या रस्त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. तर उड्डाणपुलांचेही जाळे निर्माण झाले आहेत. तर जास्तीत जास्त कंटेनरची हाताळणी करण्यासाठी रेल्वे मार्गाचेही रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच या मार्गावरून डबलडेकरची कंटेनर वाहतूक करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई-दिल्ली कॉरेडोरही उभारला जात आहे. याच ठिकाणी मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणारा शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूची उभारणी केली जात आहे. त्यासाठी १६ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. हा मार्गही याच परिसरातील चिर्ले येथे उतरणार आहे.

त्यामुळे उरण हे नवी मुंबईप्रमाणेच मुंबईचेही सर्वात जवळचे उपनगर होणार आहे, तर शिवडी ते घारापुरी व घारापुरी ते मुंबई-गोवा मार्गावरील खारपाडापर्यंतच्या रोप-वे मार्गाचीही घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच विरार ते अलिबाग सागरी मार्गही उरणमधूनच जाणार आहे. नव्याने या भागातील जेएनपीटी ते नवी मुंबईला जोडणाऱ्या सागरी मार्गासाठी सिडकोकडून ६२५ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या जोडीला नागरीकरणातही वाढ होऊ लागली आहे. सिडकोच्या द्रोणागिरी नोडमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. उरण ते नवी मुंबईला जोडणाऱ्या लोकल मार्गावरील या नागरी वस्तीत सुसज्ज अशी घरे बांधली जात आहेत. त्यामुळे लवकरच या भागातील नागरी विकासातही वाढ होणार आहे. शेकडो घरांच्या विक्रीलाही सुरुवात झालेली आहे. विविध थरांतील नागरिकांच्या गरजेची घरे द्रोणागिरी नोडमध्ये तयार आहेत. या घरांसाठीच्या दळणवळणाचीही कामे सुरू आहेत. शेकडो इमारतींच्या उभारणींची कामे सुरू आहेत. त्यामुळे भविष्यातील नागरी वस्तीही विस्तारणार आहे. त्याची सुरुवात झाली असून येथील इमारतीत नव्याने लोकवस्ती स्थिरावू लागली आहे. सिडकोच्या माध्यमातून या परिसरात मोक्याच्या ठिकाणी अल्प उत्पन्न गतासाठीही घरांची उभारणी केली आहे. यातील बहुतांशी घरे ही रेल्वे स्थानकांना लागून आहेत. या वस्तीला सुविधा पुरविण्याचे काम सिडकोकडून करण्यात येत आहे. साडेबारा टक्के विकसित भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या येथील स्थानिकांच्या हक्काची घरेही तयार होत आहेत. त्यामुळे भविष्यातील औद्याोगिक परिसरातील विकास नगरी म्हणून उरण नावारूपाला येऊ लागली आहे. या नवीन शहरा शेजारीच १५० कोटी रुपये खर्च करून केंद्र व राज्य सरकारच्या भागीदारीतून मुंबईतील ससून डॉकच्या धर्तीवरील कोकणातील सर्वात मोठे मासळी खरेदी-विक्री करणारे करंजा मच्छिमार बंदर उभारले जात आहे. त्यामुळे ही या परिसराच्या विकासात भर पडणार आहे. तसेच रोजगर निर्मिती होणार आहे.  खोपटे शहराची घोषणा-द्रोणागिरी शहराच्या शेजारीच खोपटे शहराची उभारणी केली जात असून, अनेक सुविधांनी युक्त असे शहर निर्मितीचा सिडकोचा मानस आहे. त्यामुळे द्रोणगोरी शहराला नव्या शहराची जोड मिळणार आहे. उद्योगासाठी लॉजिस्टिक पार्कची ही उभारणी होणार आहे. त्यामुळे येथील दळणवळणाच्या सुविधात आणखी भर पडणार आहे. द्रोणागिरी शहर हे भविष्यातील देशातील सर्वात मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार देणारे शहर बनणार आहे.