एका व्यक्तीने सुमारे १३ वर्षांपूर्वी बिल्डरकडून फ्लॅट विकत घेतला. तो अद्याप स्वत:च्या नावावर केला नाही. नंतर त्याने त्याच्या मेव्हण्याला राहायला दिला असे त्याने मागील कमिटीला सांगितले असावे. त्यामुळे त्याला आत्तापर्यंत बिनभोगवटा शुल्क लावलेले नाही. मात्र सोसायटीच्या दप्तरी कोणताही पत्रव्यवहार नाही. त्याबाबत कोणताही ठराव झालेला आढळत नाही. या पाश्र्वभूमीवर ज. गो. विनायक यांचे प्रश्न पुढीलप्रमाणे :-
* एखाद्या व्यक्तीच्या नावावर फ्लॅट नसतानासुद्धा तो फ्लॅट दुसऱ्याला भाडय़ाने देऊ शकतो का? राहावयास देऊ शकतो का?
* आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. मात्र, आपल्या बाबतीत संबंधित व्यक्तीने फ्लॅट खरेदी केला आहे काय याची खात्री करून घ्यावी. त्याने जर सदर फ्लॅट विकत घेतला असेल, फक्त हस्तांतरित झाला नसेल तर तो सदर फ्लॅट आपल्या नातेवाईकाला देऊ शकतो. मात्र त्याने तसे संस्थेला कळवायला हवे.
* त्याच्याकडून गेल्या १३ वर्षांचे बिनभोगवटा शुल्क वसूल (व्याजासहीत) करता येईल काय?
* या प्रश्नाचे उत्तर जर/तर मध्ये आहे. राहणारी व्यक्ती फ्लॅट मालकाची नातेवाईक आहे काय? असल्यास सोसायटीने असे चार्जेस लावू नयेत. त्या बाबतीत खात्री करून घ्यावी.
* मेव्हणा नोकरीला आहे. त्यामुळे व्याज लावू शकतो का?
* कोणी नोकरीला असो वा नसो, व्याज लावण्यासाठी कोणताही निकष लावण्याची जरूर नाही. त्याला एकच निकष म्हणजे संस्थेचा ठराव होय.
* सदर सदनिका ते विकू शकतात का?
* याचे उत्तर हो असेच आहे.

* नॉन ऑक्युपेशन चार्जेसचा हिशेब दिलेला नाही. तो मागता येतो का?
एस. डी. सावंत, चेंबूर
* हो. तो तुमचा हक्कच आहे. संस्था तो देत नसेल तर त्याबाबत सतत पत्रव्यवहार ठेवा. तो पुढे कारवाईसाठी उपयोगी पडेल.
* आपली सदनिका भाडय़ाने (लीव्ह लायसन्सवर) देता येते का?
* हो. हा देखील आपला हक्कच आहे आणि तो आपणाला कायद्याने दिलेला आहे. परंतु तो देताना योग्य त्या गोष्टीचे पालन करावे. उदा. सोसायटीला कळवणे, करारनामा नोंद करणे, संबंधित पोलीस ठाण्याला ही गोष्ट कळवणे इत्यादी.  
टॅक्स कन्सल्टंट अ‍ॅण्ड लीगल अ‍ॅडव्हायजर्स
ब्लॉक नं. २ ए विंग, तळमजला, चंदन सोसायटी, कीíतकर कंपाऊंड, नूरी बाबा दर्गा रोड, मखमली तलावाजवळ ऑफ एल.बी.एस. रोड, ठाणे (प.) ४००६०१. दू. ०२२-२५४०३३२४
ghaisas2009@gmail.com