लाच मागणे हाही गुन्हा असल्याने अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील मंडळ अधिकारी अशोक अहिरे याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुकचे रहिवासी गुलाब पाटील यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून लावलेल्या सापळ्यात अशोक अहिरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वडील आणि काकू यांच्या नावावरील शेतीच्या सात-बारा उताऱ्यावरील इतर नावे कमी करण्यासंदर्भात पाटील यांनी भडगावच्या तहसीलदारांकडे रीतसर अर्ज केला होता. तो तत्कालीन मंडल अधिकारी अहिरे यांच्याकडे देण्यात आल्यावर बराच पाठपुरावा करूनही पाटील यांचे काम होत नव्हते. त्यातच अहिरे यांची अमळनेरला बदली होऊन त्याजागी दुसरे अधिकारी आले. पाटील यांनी आपल्या कामाबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मूळ अर्जच मिळून आला नाही. त्यामुळे पाटील यांनी त्याबद्दल अहिरे याच्याकडे विचारणा केली असता काम करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी अहिरेने केली. पाटील यांनी याबद्दल तक्रार केल्यावर कारवाई करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2013 रोजी प्रकाशित
लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
लाच मागणे हाही गुन्हा असल्याने अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील मंडळ अधिकारी अशोक अहिरे याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात
First published on: 29-11-2013 at 09:20 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against officer demanding bribe in jalgaon