22 September 2020

News Flash

नोकरीचे आमिष दाखवत साडेतीन लाखांची फसवणूक

शहर परिसरात सध्या नोकरी, दामदुप्पट पैसा यासह अन्य काही गोष्टींचे प्रलोभन दाखवत फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत.

| September 20, 2014 12:53 pm

शहर परिसरात सध्या नोकरी, दामदुप्पट पैसा यासह अन्य काही गोष्टींचे प्रलोभन दाखवत फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. नोकरीचे आमिष दाखवत एका बेरोजगार युवकाची साडेतीन लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प येथील आनंदरोड परिसरातील रहिवासी रवींद्र रंगनाथ काळे (४०) दोन वर्षांपासून बेरोजगार आहेत. कॉलेज रोड परिसरातील लायन्स सिक्युरिटी लिमिटेड येथे त्यांनी २०१२ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत रेवनाथ जगताप आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी काही पैशांची मागणी केली. या कालावधीत नोकरीचे कारण दाखवत आपल्याकडून संबंधितांनी तीन लाख ७७ हजार रुपये घेतले. मात्र नोकरी काही दिली नाही. पैशाची मागणी केली असता संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी जगताप यांच्यासह ४ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 12:53 pm

Web Title: fraud of three and a half lakh by showing job
टॅग Cheating,Fraud,Job
Next Stories
1 प्रचाराआधीच ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर अपप्रचार
2 ‘तू दुर्गा’ रांगोळी प्रदर्शनातून स्त्रीशक्तीला सलाम
3 आरोग्य मदतवाहिनीचा हजारो रुग्णांना लाभ
Just Now!
X