अखिल भारतीय विवेकानंद संस्कार संस्थेच्यावतीने आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प रविवारी (दि. १७) चैतन्यमहाराज देगलूरकर गुंफणार आहेत. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प निरुपणकार विवेक घळसासी यांनी गुंफले. दुसरे पुष्प डॉ. अशोक मोडक यांनी, तर तिसरे पुष्प चैतन्यमहाराज देगलूरकर हे ‘स्वामी विवेकानंद आणि वेदान्त’ या विषयावर गुंफणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधाकर भालेराव राहणार आहेत. जुना औसा रोडवरील संस्थेच्या छात्रशक्ती केंद्रातील विवेकानंद सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता हे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समारोह समितीचे अध्यक्ष डॉ. एस. बी. सलगर, यशवंत जोशी आदींनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2013 रोजी प्रकाशित
चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे आज व्याख्यान
अखिल भारतीय विवेकानंद संस्कार संस्थेच्यावतीने आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प रविवारी (दि. १७) चैतन्यमहाराज देगलूरकर गुंफणार आहेत.
First published on: 17-03-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lecture of chaitanyamaharaj deglurkar today