21 October 2020

News Flash

गंगाखेडच्या व्यापाऱ्याचा परभणीमध्ये निर्घृण खून

गंगाखेड येथील व्यापारी जगदीश नरहरी काळे यांचा परभणीच्या ऊरसात खून केल्याचा प्रकार घडला. अनतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. काळे हे सोमवारी (दि. १०) येथे

| February 14, 2014 01:15 am

गंगाखेड येथील व्यापारी जगदीश नरहरी काळे यांचा परभणीच्या ऊरसात खून केल्याचा प्रकार घडला. अनतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
काळे हे सोमवारी (दि. १०) येथे ऊरूस पाहण्यास आले होते. कारेगाव रस्त्यावरील क्रांती नगरात काकाच्या घरी सायंकाळी येऊन रात्री ऊरसात गेले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास ४ ते ५ अनोळखी व्यक्तींनी जखमी अवस्थेत काळे यांना काकाच्या घरासमोर आणून सोडले व ते पसार झाले. काळे यांचे काका व इतरांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपल्याला ४-५ जणांनी पट्टा, काठी व दगडाने मारहाण केल्याचे मृत्यूपूर्वी काळे यांनी आई विमल काळे यांना सांगितले. विमल काळे यांनी नवा मोंढा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:15 am

Web Title: murder of gangakhed trader in parbhani
टॅग Parbhani
Next Stories
1 केळकर समितीची शिफारस
2 आयपीएलमध्ये प्रथमच मराठवाडय़ाचा ‘विजय’!
3 नगर जिल्ह्य़ात प्रभाव नाही
Just Now!
X