गणेश विसर्जन करताना पुणतांबे येथे गोदावरी नदीत बुडून गोंडेगाव (ता. श्रीरामपूर) येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुदैवी मृत्यू झाला. अकोले तालुक्यातही कळस येथे प्रवरा नदीत एक तरुण वाहून गेला.  
गोंडेगाव येथे जाणता राजा युवक मंडळाने बुधवारी गावात दुपारी विसर्जन मिरवणूक काढली. मिरवणूक झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते गणपती घेऊन पुणतांबा येथे विसर्जन करण्यासाठी गेले. नदीपात्रात शनिमंदिराजवळ गणेशाचे विसर्जन करीत असताना विलास काशिनाथ कदम (वय २०) या तरुणाचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला. नदीत वाळू तस्करांनी खोल खड्डे केले आहेत. त्यात अडकून त्याचा मृत्यू झाला. रात्री त्याच्यावर गोंडेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत विलास हा बोरावके  महाविद्यालयात तिस-या वर्षात शिकत होता.
णेश विसर्जनासाठी गेलेला तरुण प्रवरा नदीत बुडून मृत्यू पावल्याची घटना काल तालुक्यातील कळस येथे घडली. रावसाहेब ऊर्फ हिरामण अर्जुन तोरमल (वय २९, रा. पिंपळगाव निपाणी) असे या तरुणाचे नाव आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील आढळा नदीला पाणी नसल्याने आढळा परिसरातील गणपतींचे विसर्जन काही जणांनी देवठाण धरणात तर काहींनी प्रवरा नदीवर येऊन केले. पिंपळगाव निपाणी येथील ग्रामविकास मंडळाच्या गणपतीचे विसर्जन कळस येथे करण्यात आले. विसर्जनाच्या वेळी मृत रावसाहेब हा नदीत उतरला होता. मात्र त्या वेळेला अचानक तो गटांगळ्या खाऊ लागला. बरोबर असलेल्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. सुमारे तीन तासानंतर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले. मयत रावसाहेब याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. िपपळगाव निपाणी येथे शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.