मराठवाडय़ातील रेल्वे प्रश्नाशी निगडित विविध मागण्यांवर आपण गंभीरपणे विचार करून रेल्वे बोर्डाच्या सदस्य या नात्याने त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
महापौर प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुणे येथे सुळे यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत मराठवाडय़ाच्या प्रलंबित रेल्वे प्रश्नांना त्यांनी स्पर्श केला.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, प्रमोद वाकोडकर, राजेंद्र वडकर, मराठवाडा प्रवासी संघटनेचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंढे, श्रीकांत गडप्पा, गणपतआप्पा सौंदळे (परभणी), शिवाजी नरहीरे (लातूर) आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
पूर्णा येथे नवीन रेल्वेचे विभागीय कार्यालय व्हावे, मराठवाडय़ातून मुंबई व पुणे येथे जाण्यासाठी दररोज नवीन गाडी सुरू करावी, मुंबई-लातूर गाडीचा विस्तार नांदेडपर्यंत करावा, मराठवाडय़ातून धावणाऱ्या तपोवन व मराठवाडा एक्स्प्रेसला जादा डबे जोडावेत आदी मागण्या शिष्यमंडळाच्या वतीने सुळे यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
मराठवाडय़ातील रेल्वे प्रश्नामध्ये लक्ष घालणार – खासदार सुळे
मराठवाडय़ातील रेल्वे प्रश्नाशी निगडित विविध मागण्यांवर आपण गंभीरपणे विचार करून रेल्वे बोर्डाच्या सदस्य या नात्याने त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. महापौर प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुणे येथे सुळे यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत मराठवाडय़ाच्या प्रलंबित रेल्वे प्रश्नांना त्यांनी स्पर्श केला.
First published on: 11-01-2013 at 01:59 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will look in marathwada railway problems mp sule