टीव्हीफेम कलाकारांच्या कॉमेडी एक्सप्रेसने बोचऱ्या थंडीत हास्याचे फवारे उडवून प्रेक्षकांना पोट धरून हसावयास लावले. निखळ मनोरंजनाने प्रेक्षकही भारावून गेले. कळमनुरी महोत्सवात प्रेक्षकांनी ही पर्वणी साधली.
महोत्सवातील ‘हास्यरंग’ कार्यक्रमात मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी अंबिये, मीरा मोडक, कमलाकर सातपुते, आशिष पवार, अरुण कदम, भूषण कडू या कलावंतांनी साभिनय विनोदातून प्रेक्षकांना हसवत ठेवले. ‘कॉमेडी एक्सप्रेस’मधील कलावंतांच्या हस्ते महिलांच्या सॅक रेस व मटकी फोड स्पध्रेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. सॅक रेसमध्ये श्व्ोता जुने, माधुरी माद्रक, रश्मी बुस्रे, संगीत जोगदंड व प्रणिता बुस्रे यांनी बक्षिसे पटकावली. मटकी फोड स्पध्रेत मंजूषा सोवितकर, सुप्रिया पतंगे, सपना लोंढे व कांचन जाधव या विजेत्यांना डिझायनर साडय़ा व मिक्सर भेट देण्यात आले. माजी मंत्री रजनी सातव, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव, डॉ. प्रज्ञा सातव, पोलीस निरीक्षक हनुमंत वाकडे आदींची उपस्थिती होती. प्रा. प्रमोद इंगोले व प्रा. काळे यांनी सूत्रसंचालन केले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2013 रोजी प्रकाशित
कॉमेडी एक्सप्रेसची ‘फुल टू धमाल’
टीव्हीफेम कलाकारांच्या कॉमेडी एक्सप्रेसने बोचऱ्या थंडीत हास्याचे फवारे उडवून प्रेक्षकांना पोट धरून हसावयास लावले. निखळ मनोरंजनाने प्रेक्षकही भारावून गेले. कळमनुरी महोत्सवात प्रेक्षकांनी ही पर्वणी साधली.
First published on: 01-01-2013 at 01:47 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commedy express full to dhamal