काही दिवसांपासून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये फेरबदल होण्याच्या चर्चाना शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड अनपेक्षित मानली जात आहे. त्यांच्याच सोबतीला भद्रावतीचे मुनाज शेख्ही असतील.
दरम्यान, गजानन पाल यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी आपला पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेकांची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी समोर आली होती, मात्र वरिष्ठस्तरावरून त्याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता.
दरम्यानच्या काळात जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांनी मुंबईवारी केली. यासाठी अमित उमरे, मुनाज शेख, गजानन पाल यांची नावे चर्चेत होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुंबईत राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची बैठक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत चंद्रपूर जिल्हय़ाची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावर आणि भद्रावतीचे मुनाज शेख यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अमर बोडलवार हे गोंडपिंपरी क्षेत्रातून निवडून आले होते. दरम्यान अमित उमरे यांच्यावर पक्षाने महराष्ट्र प्रदेश सचिवपदाची जबाबदारी टाकली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील फेरबदलांच्या चर्चाना विराम
काही दिवसांपासून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये फेरबदल होण्याच्या चर्चाना शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड अनपेक्षित मानली जात आहे. त्यांच्याच सोबतीला भद्रावतीचे मुनाज शेख्ही असतील.
First published on: 09-04-2013 at 02:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Full stop of gossip on changes in ncp youth congress