सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने एका वर्षांमध्ये चार शुध्दजल प्रकल्प उभे केले. या जबाबदारीची दखल घेऊन जागतिक सामाजिक बांधिलकी दिनाच्या निमित्ताने ‘वल्र्ड सीएसआर’ या संस्थेने बँकेने केलेल्या या भरघोस कार्यासाठी एक पारितोषिक बहाल केले. त्यामध्ये बँकेला ‘बेस्ट युज ऑफ़ सीएसआर प्रॅक्टीसेस इन बँकींग अँड फ़ायनान्स’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये देशातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, कोकाकोला, गोदरेज, बजाज व राष्ट्रीयीकृत बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन एस्.एन्. कॉन्फिडरेशन ऑफ़ बिझनेस आणि ब्लू डार्ट या जागतिक कंपन्यांमार्फत केले होते. बँकेमार्फत बँकेचे चिफ मॅनेजर संजय शिरगांवे यांनी हे पारितोषिक स्वीकारले.
या पारितोषिकामुळे बँकेच्या मानामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल बँकेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, बँकेचे मार्गदर्शक प्रकाश आवाडे, अध्यक्ष अशोकराव सौंदत्तीकर, बाबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी. टी. कुंभार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2013 रोजी प्रकाशित
इचलकरंजी जनता बँकेचा सामाजिक कार्याबद्दल गौरव
सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने एका वर्षांमध्ये चार शुध्दजल प्रकल्प उभे केले. या जबाबदारीची दखल घेऊन जागतिक सामाजिक बांधिलकी दिनाच्या निमित्ताने ‘वल्र्ड सीएसआर’ या संस्थेने बँकेने केलेल्या या भरघोस कार्यासाठी एक पारितोषिक बहाल केले. त्यामध्ये बँकेला ‘बेस्ट युज ऑफ़ सीएसआर प्रॅक्टीसेस इन बँकींग अँड फ़ायनान्स’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
First published on: 23-02-2013 at 08:12 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ichalkaranji janata bank honoured by world csr asso