चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे मनोहर भोईर

उरण विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विवेक पाटील यांना ८४६ मतांनी पराभूत करीत शिवसेनेचे उमेदवार मनोहर गजानन भोईर विजयी झाले आहेत.

उरण विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विवेक पाटील यांना ८४६ मतांनी पराभूत करीत शिवसेनेचे उमेदवार मनोहर गजानन भोईर विजयी झाले आहेत. भोईर यांच्या विजयात उरण शहरातील महत्त्वाचा वाटा असून  ग्रामीण भागातूनही शिवसेनेला भरघोस मतदान झाले आहे. काँग्रेस तिसऱ्या तर भाजप चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शेकापला विजयाची खात्री असल्याने शेकाप कार्यकर्त्यांनी लालबावटे घेऊन मतमोजणीच्या परिसरात प्रवेश केला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटकाव केल्याने झेंडे गुंडाळावे लागले. मतमोजणीच्या एकूण १७ फेऱ्यांपर्यंत विवेक पाटील हे आघाडीवर होते.   १८ व्या फेरीनंतर चित्र पालटून शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. २२ व्या फेरीत दोन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतमोजणी थांबविण्यात येऊन अखेरीस बिघाड दुरुस्त झाल्यानंतर शेवटच्या २३ फेरीत शिवसेनेचे मनोहर भोईर यांचा विजय झाल्याचे उरण विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी जाहीर केले. मनोहर भोईर यांना विजयी केल्यानंतर शिवसेनेने एकच विजयोत्सव साजरा केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena manohar gajanan bhoir wins from uran assembly