महापालिका शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी उधळून लावला. शिक्षकांनी बसवलेला संगीताचा कार्यक्रम सुरू असताना दहा ते पंधरा शिवसैनिक या कार्यक्रमात घुसले आणि त्यांनी घोषणा देत तसेच तोडफोड करत हा कार्यक्रम बंद पाडला.
शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी दिवाळीच्या सुटीत शिक्षकांसाठी स्नेहमेळावा आणि फराळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर तो गेल्या आठवडय़ात रद्द करण्यात आला होता. रद्द झालेला कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या प्रांगणात सायंकाळी हा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमात मुख्यत: मंडळातील शिक्षक भावगीत गायन करत होते. कार्यक्रम सुरू असताना अचानक दहा ते पंधरा शिवसैनिक घोषणा देत कार्यक्रमाच्या व्यासपीठावर घुसले आणि त्यांनी कार्यक्रम बंद पाडला. त्यातील काहीजणांनी ध्वनिवर्धक व अन्य साहित्य तोडल्याची चर्चा कार्यक्रमानंतर ऐकायला मिळाली. या गोंधळामुळे कार्यक्रम तातडीने बंद करण्यात आला. मंडळाचे सदस्य, पदाधिकारी तसेच अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
शिक्षण मंडळातील मेळावा शिवसैनिकांनी उधळून लावला
महापालिका शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी उधळून लावला. शिक्षकांनी बसवलेला संगीताचा कार्यक्रम सुरू असताना दहा ते पंधरा शिवसैनिक या कार्यक्रमात घुसले आणि त्यांनी घोषणा देत तसेच तोडफोड करत हा कार्यक्रम बंद पाडला.
First published on: 23-11-2012 at 03:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena members disturbes the education mandal meet