पुणे येथील साखर संकुलात उभारण्यात आलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. दि. ११ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांनी पद्मश्री विखे पाटील यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘सहकारधुरीण’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी होणार आहे. पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2014 रोजी प्रकाशित
पद्मश्री विखे यांच्या पुतळय़ाचे उद्या पुणे येथे अनावरण
पुणे येथील साखर संकुलात उभारण्यात आलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. दि. ११ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
First published on: 10-01-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unveiled of padmashri vikhe statue tomorrow at pune