scorecardresearch

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या स्थापन केलेले सरकार शिवसेना भाजपाचेच आहे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.

ते शिवसेनेचे (Shivsena) सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून विधानसभेचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक होते आणि तीन वर्षे स्थायी समितीचे सदस्य आणि चार वर्षे सभागृह नेते होते.

त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथून झाले. नंतर त्यांनी ५६व्या वर्षी बीएची डिग्री प्राप्त केली. त्यांनी श्रीमती लता एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव श्रीकांत शिंदे आहे. ते ऑर्थोपेडिक सर्जन असून ते कल्याण मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.


Read More
Uddhav Thackeray Slams Eknath Shinde
उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना उत्तर; “जमलेल्या माझ्या तमाम देशभक्तांनो, म्हटल्यावर मिंधे लगेच दाढी खाजवत बोलले.. “

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो या वाक्यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप

Rahul Shewale and eknath shinde
जागावाटप अंतिम टप्प्यात? मुख्यमंत्र्यांची खासदारांबरोबरची बैठक संपल्यानंतर राहुल शेवाळे म्हणाले, “महायुतीचा फॉर्म्युला…”

जागावाटपात अनेक खासदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चेवरही राहुल शेवाळे यांनी उत्तर दिलं आहे.

mp sanjay mandlik vs bjp dhananjay mahadik
कोल्हापुरात शिंदे गट – भाजप मधील तणाव वाढीस

खासदार संजय मंडलिक यांनी मलाच उमेदवारी मिळणार असा ठाम दावा सुरू केला असताना भाजपने मतदारसंघ पक्षाला मिळावा अशी मागणी कायम…

nashik loksabha election marathi news
नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

महायुतीत नाशिक लोकसभा जागेचा वाद विकोपाला गेला असताना भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या मतदार संघावर हक्क सांगत शिवसेना…

ex servicemen leaders of mathadi workers interested to contest lok sabah election from satara
साताऱ्यातून आजी-माजी सैनिक, माथाडी कामगारांचे नेतेही इच्छुक

या मतदारसंघात सर्वाधिक दोन विधानसभा सदस्य शिवसेनेचे असल्याने येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेलाही मोठे महत्त्व आहे.

Manoj Jarange Patils direct warning to the government
Manoj Jarange on Shinde Gov.: “…तर मी माझं नाव बदलून टाकेल”, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा!

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अजूनी सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला…

shiv sena shinde group, nashik lok sabha seat, bjp, ncp ajit pawar group, claming, lok sabha 2024, maharashtra politics,
नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

महायुतीत नाशिक लोकसभा जागेचा वाद विकोपाला गेला असताना भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही या मतदार संघावर हक्क सांगत शिवसेना…

Priya Dutt
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर? मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का?

काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Eknath Shinde Slams Uddhav THackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!, “शिवतीर्थावर हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणायला….”

या लोकांना जनतेनेच दोन वर्षांपूर्वी तडीपार केलं आहे अशीही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.

bacchu kadu criticized ravi rana by taking devendra fadnavis and eknath shinde name
“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांपेक्षा मी रवी राणांना घाबरतो”… बच्‍चू कडूंनी उडवली खिल्‍ली

आम्ही घाबरलो असल्याने आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावे लागेल, प्रचार करावा लागेल. खूप कठीण झाले आहे

cm eknath shinde raj thackeray mns
राज ठाकरे महायुतीत सामील होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य निर्णय…”

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर सूचक विधान केलं.

cm eknath shinde rahul gandhi
“हिंदू धर्माची शक्ती संपवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे का?” एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना सवाल; म्हणाले…

एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना ५ मिनिटं भाषण करायला दिली. यावरून त्यांची पत…!”

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×