नांदेड हा मराठवाडा विभागातील एक जिल्हा असून ते ऐतिहासिक शहर आहे. नांदेड (Nanded) हे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर वसले आहे. नांदेडचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किमी असून या जिल्ह्यात १६ तालुके आहेत. धार्मिकदृष्ट्या नांदेड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून शीख धर्मीयांचे शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचा प्रसिद्ध गुरुद्वारा येथे आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वाचे शहर आहे. गोविंदसिंह यांच्या गुरुद्वारासह माहुरच्या रेणुकादेवीचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर अशी महत्त्वाची मंदिरं नांदेड जिल्ह्यात आहेत. तसेच शंभर फूटी मजार, बिलोली मशिददेखील येथे आहे. याचबरोबर प्रसिद्ध भुईकोट किल्ला आणि सहस्रकुंडचा धबधबा ही नांदेड जिल्ह्यात आहे. Read More
नांदेडहून आसामला गेलेल्या वरील कार्यकर्त्यांतील अनेकजणं जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छुक असून ‘कामाख्या’ भेट आणि दर्शनामुळे त्यांचा दौरा समाजमाध्यमांतही चर्चेमध्ये…
मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न म्हणून त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी महसूल आयुक्तालयाच्या विषयात हात…