15 January 2021

News Flash

ऑक्टोबरअखेर म्युच्युअल फंड गंगाजळी १ टक्का वाढून २२.२३ लाख कोटींवर

सप्टेंबर महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून ७७२७ कोटी गुंतविण्यात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

 लिक्विड फंडात सकारात्मक गुंतवणुकीचा ओघ *   समभागसंलग्न फंडातील ओघाचा आठ महिन्यांचा उच्चांक

मुंबई : जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींच्या पडसाद भांडवली बाजारावर उमटले तरी म्युच्युअल फंडांबाबत गुंतवणूकदारांमध्ये आस्था कायम असल्याचे दिसून येते. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात एकूण फंड गंगाजळी १ टक्क्याने वाढून २२.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे म्युच्युअल फंडांची शिखर संघटना ‘अ‍ॅम्फी’ने शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत दिसून आले आहे.

सप्टेंबरअखेर देशातील ४२ फंड घराण्यांतील सर्व योजनांमधील गुंतवणूक गंगाजळी ही २२.०४ लाख कोटी रुपये होती. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्व फंड घराण्यांच्या सर्व योजनांमधील गुंतवणूक मालमत्ता ही २१.४१ लाख कोटी रुपये होती.

सप्टेंबर महिन्यात ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ समूहाशी संलग्न कंपन्या मुदतपूर्ती झालेल्या रोख्यांची रक्कम परत न करू शकल्याचा अनेक फंड योजनांवर विपरीत परिणाम दिसून आला होता. लिक्विड आणि मनी मार्केट फंडाच्या मालमत्तेतून सुमारे २ लाख कोटी गुंतवणूकदारांनी काढून घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर ऑक्टोबर २०१८ मध्ये या फंडांनी पुन्हा सकारात्मक ओघ मिळविता आला आहे. सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंडातून गुंतवणूकदारांनी एकूण २.३ लाख कोटी रुपये काढून घेतले होते, त्या उलट सरलेल्या ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंडांतील शुद्ध गुंतवणूक ओघ ३५,५२९ कोटी रुपयांनी वाढला आहे.

उल्लेखनीय म्हणजे छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडून ओघ सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ३० टक्के अधिक राहिल्याचे आढळून आले. समभाग गुंतवणूक करणाऱ्या (इक्विटी) म्युच्युअल फंडात सातत्याने ५६ व्या महिन्यांत वाढ झाली असल्याचे अ‍ॅम्फीच्या आकडेवारीत दिसून आले. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये समभागसंलग्न फंडात १३ टक्के अधिक १२,६२२ कोटी रुपयांची वाढ झाली असून, हा गेल्या आठ महिन्यांतील उच्चांकी ओघ आहे. एक तर नियमितपणे सुरू असलेला नियोजनबद्ध गुंतवणुकीचा (एसआयपी) ओघ हा अव्याहतपणे कायम आहे, त्यातच सरलेल्या महिन्यात अनेक फंडाच्या आलेल्या नवीन योजनांमधून जवळपास ३,००० कोटी रुपये उभारण्यात आल्याचा हा परिणाम आहे.

ऑक्टोबर महिन्यांत नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या (एसआयपी) माध्यमातून ७,९८५ कोटी गुंतविण्यात आले. सप्टेंबर महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून ७७२७ कोटी गुंतविण्यात आले होते.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदार खात्यांच्या (फोलिओ) संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये म्युच्युअल फंड फोलिओंच्या संख्येत ६.३१ कोटींवरून वाढ होत यंदा ती  ७.९० कोटींवर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 3:18 am

Web Title: at the end of october mutual fund investment increase by 1 percent
Next Stories
1 रुपया सशक्त ; ५० पैशांनी वाढ
2 ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीत अवघी १.५ टक्का वाढ
3 पेट्रोल, डिझेल स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Just Now!
X