औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आरोग्य तसेच सेवाशर्ती यासंबंधी नियमांना चालू महिनाअखेपर्यंत अंतिम रूप दिले जाईल आणि येत्या १ एप्रिलपूर्वी कामगार कायद्यासंबंधी चार प्रमुख सुधारणांची अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करण्याची योजना केंद्राने बनविली आहे. कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून वाढीव कपात सुचविणाऱ्या बहुचर्चित नवीन वेतन संहितेला यातून अंतिम रूप दिले जाईल.

केंद्रीय कामगार मंत्रालयाने येत्या १ एप्रिलपासून एकाच वेळी चार कामगार संहिता लागू करण्याचे नियोजन आखले आहे.

औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आरोग्य तसेच सेवाशर्ती यासंबंधी असलेल्या चार कायद्यांचे चार संहितांमध्ये एकत्रीकरण करण्याच्या अंतिम टप्प्यात सध्या कामगार मंत्रालय आहे.

गेल्या वर्षी संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर, नोव्हेंबर २०२० मध्ये वेतन वगळता या संहितांच्या अंतर्गत नियमांचे कामगार मंत्रालयाकडून सर्व संबंधितांमध्ये अभिप्रायासाठी वितरण केले गेले आहे. तर वेतन संहिता विधेयक, हे २०१९  मंजूर करण्यात आले आहे.