सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होण्यापासून निर्देशांक वधारण्यात संथ वाटचाल करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराची वाटचाल मंगळवारी दिवसभरात कायम संथ राहिली. अवघ्या ९.५३ अंशवाढीमुळे मुंबई निर्देशांक १९,१७९.३६ वर, तर निफ्टी २.५० अंशवाढीने ५,८३५.३० वर बंद झाला.
रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या आशेवर ‘सेन्सेक्स’ने आजसह तीन सत्रांत ४५० अंशांची कमाई केली आहे. शेअर बाजाराची आजच्या सत्राची सुरुवात ४०.४३ अंशवाढीसह झाली. मात्र पुढील काही मिनिटांतच ही प्रक्रिया थांबली. व्याजदराशी निगडित वाहन, भांडवली वस्तू, बँक यांचेही समभाग घसरू लागले. महिन्याच्या नीचांकावर असललेल्या डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीचीही निराशेत भर पडली. परिणामी दुपारच्या टप्प्यात सेन्सेक्सही १९ हजारांवर (१९,०४२.०८) येऊन ठेपला. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे सलग तिसऱ्या सत्रात सकारात्मक पातळीवर राहताना सेन्सेक्सने किरकोळ वाढ नोंदविली.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी २०१२-१३ चा आर्थिक आढावा जाहीर करताना चालू आर्थिक वर्षांचा अर्थविकास आलेख उंचावता ठेवल्यामुळे बाजार दिवसअखेर वधारणेसह बंद झाला. मात्र ही वाढ किरकोळ ठरली. रुपयाच्या तुलनेत डॉलर वधारल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रीय निर्देशांक ०.६४ टक्क्यांनी वधारला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तेल व वायू निर्देशांक ०.५१ टक्क्यांनी वाढला. शेअर बाजारातील सत्रातील व्यवहार संपुष्टात आल्यानंतर घसघशीत ३० टक्के निव्वळ नफ्यातील वाढीचे तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या एचडीएफसी बँकेचा समभागही मात्र १.७ टक्क्यांनी घसरला. गुंतवणूकदारांनी यासाठी नफेखोरीचा अवलंब केला. त्याचबरोबर लार्सन अॅन्ड टुब्रो, भारतीय स्टेट बँक, टाटा मोटर्सही २ टक्क्यांपर्यंत घसरले होते. रिलायन्स, सन फार्मा, इन्फोसिसचे समभाग मात्र वधारले. दोन्ही प्रमुख शेअर बाजार बुधवारी महावीर जयंतीनिमित्ताने बंद राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2013 रोजी प्रकाशित
शेअर बाजार तेजीतच; मात्र वाटचाल संथावली
सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होण्यापासून निर्देशांक वधारण्यात संथ वाटचाल करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराची वाटचाल मंगळवारी दिवसभरात कायम संथ राहिली. अवघ्या ९.५३ अंशवाढीमुळे मुंबई निर्देशांक १९,१७९.३६ वर, तर निफ्टी २.५० अंशवाढीने ५,८३५.३० वर बंद झाला.
First published on: 24-04-2013 at 03:38 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share market in increase but work condition down