आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०७० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०७० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे वाढलेले दर आज पुन्हा घसरले आहेत.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०७० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,०७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,४९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,७१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,०७० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३६ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.