रुपया सव्वा महिन्याच्या तळाला!

सप्ताहारंभी १५ पैशांनी घसरत रुपया तब्बल सव्वा महिन्यांच्या तळात स्थिरावला. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ६२.३१ पर्यंत खाली आला.

सप्ताहारंभी १५ पैशांनी घसरत रुपया तब्बल सव्वा महिन्यांच्या तळात स्थिरावला. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ६२.३१ पर्यंत खाली आला. १० पैशांच्या वाढीने चलनाने गेल्या आठवडय़ाची समाप्ती केली होती. तत्पूर्वीही चलन ५० पैशांनी रोडावले होते. नव्या व्यवहाराची सुरुवात ६२.३५ अशी निराशाजनक केल्यानंतर सोमवारी सत्रात चलन ६२.४६ पर्यंत घसरले. चलनातील सोमवारच्या ०.२४ टक्के घसरणीमुळे रुपयाने ३ डिसेंबरनंतरचा तळ गाठला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rupee price fall down

ताज्या बातम्या