बाजाराचा तंत्र-कल : सूर तेच छेडिता..

१७ सप्टेंबर २०२१ ला १७,७९२ चा उच्चांक नोंदवत, २१ सप्टेंबरचा नीचांक १७,३२६, म्हणजेच घसरण ४६६ अंशांची.

आशीष ठाकूर

निफ्टीने तेजीचा सूर छेडिता, नवे उच्चांकाचे गीत उमटते! हे असे काहीसे गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. यातील दिलासादायक बाब म्हणजे वाचकांसाठी विकसित केलेली ‘निफ्टीचा ३०० अंशांचा परीघ’ ही संकल्पना उच्चांकाच्या अनोख्या प्रदेशात जीपीएस मार्गदर्शक प्रणालीप्रमाणे कार्यरत होत आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या. 

गुरुवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ६१,३०५.९५

निफ्टी : १८,३३८.५५

निर्देशांकाच्या सध्याची उच्चांकाची वाटचाल म्हणजे अनोळखी प्रदेशातील वाटचाल. अशा वेळेला नेहमी इतिहासात डोकावत भविष्याच्या वाटचालीची आखणी करणे गरजेचे असते. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर हलकी फुलकी घसरण ही ४५० ते ५०० अंशांची असते. जसे की, १७ सप्टेंबर २०२१ ला १७,७९२ चा उच्चांक नोंदवत, २१ सप्टेंबरचा नीचांक १७,३२६, म्हणजेच घसरण ४६६ अंशांची.

दुसरी घसरण २४ सप्टेंबरचा उच्चांक १७,९४७ वरून १ऑक्टोबरचा नीचांक १७,४५२.. घसरण ४९५ अंशांची.

आता हाच ४५० ते ५०० अंशांच्या घसरणीचा दुवा पकडत, वर म्हटल्याप्रमाणे प्रदेश अनोळखी असला तरी ज्ञात असलेल्या निफ्टी निर्देशांकाच्या महत्त्वाचा वळणबिंदू अथवा मैलाचा दगड ठरलेल्या स्तरावर ४५० ते ५०० अंशांची घसरण मिळवली असता निफ्टी निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक काय असेल त्याचे आकलन होईल.

निफ्टी निर्देशांकावर मैलाचा दगड असलेल्या १८,००० चा स्तर पकडल्यास, त्यात ४५० अंश मिळवले असता १८,४५० आणि निफ्टी निर्देशांकाचा १८,१०० चा स्तर पकडल्यास त्यात ५०० अंश मिळवले असता १८,६०० हा संभाव्य उच्चांक दृष्टीपथात येईल. या स्तरावर समभाग खरेदी करण्यापेक्षा हलक्या-फुलक्या घसरणीनंतर समभाग खरेदी करणे श्रेयस्कर.

निकालपूर्व विश्लेषण

१) एसीसी लिमिटेड

*  तिमाही निकाल -मंगळवार,१९ ऑक्टो.

* १४ ऑक्टोबरचा बंद भाव- २,३१०.३० रु.  

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर   – २,३०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,३०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,३८० रुपये, द्वितीय लक्ष्य २,४८० रुपये.

ब) निराशादायक निकाल: २,३००चा केंद्रबिंदू स्तर तोडत २,१०० पर्यंत घसरण.

२) हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड 

*  तिमाही निकाल – मंगळवार,१९ ऑक्टो

*  १४ ऑक्टोबरचा बंद भाव – २,६४८.८० रु. 

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,६५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,९५०  रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,४५० रुपयांपर्यंत घसरण.

३) बायोकॉन लिमिटेड

*  तिमाही निकाल – गुरुवार, २१ ऑक्टो   

* १४ ऑक्टोबरचा बंद भाव –  ३४७.८० रु.  

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर    – ३५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३८० रुपये, द्वितीय लक्ष्य ४१० रुपये

ब) निराशादायक निकाल : ३५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३२० रुपयांपर्यंत घसरण.

४) टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड  

* तिमाही वित्तीय निकाल   – शुक्रवार, २२ ऑक्टोबर  

*  १४ ऑक्टोबरचा बंद भाव – ८४९ रु.  

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर      – ८३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८९० रुपये, द्वितीय लक्ष्य ९४० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ८३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७८० रुपयांपर्यंत घसरण.

५) टाटा एलेक्सी लिमिटेड      

* तिमाही  निकाल – शुक्रवार,२२ ऑक्टोबर          

* १४ ऑक्टोबरचा बंद भाव- ६,२५५.४५ रु.  

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर  – ६,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल :समभागाकडून ६,००० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ६,४०० रुपये,द्वितीय लक्ष्य ७,४००  रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५,४०० रुपयांपर्यंत घसरण.

६) आयसीआयसीआय बँक

* तिमाही वित्तीय निकाल – शनिवार,२३ ऑक्टोबर

* १४ ऑक्टोबरचा बंद भाव- ७२७.१० रु.  

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल :समभागाकडून ७०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ७५० रुपये,द्वितीय लक्ष्य ८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६५० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stock market prediction for upcoming week market outlook for next week zws

Next Story
बाजाराचे तालतंत्र : तेजीवाल्यांची सरशी ‘निफ्टी’ला कुठवर नेईल?
ताज्या बातम्या