14th April Panchang & Rashi Bhavishya: आज १४ एप्रिलला चैत्र शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी रविवारी दुपारी ११.४४ मिनिटांपर्यंत राहील. १४ एप्रिल हा चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस आहे. तसेच दिनविशेष पाहिल्यास १४ एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मेष ते मीन राशीला आजचा दिवस कसा जाईल, हे पाहूया..

१४ एप्रिल पंचांग व राशीभविष्य –

मेष:- तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. कामातील बदल जाणून घ्यावेत. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात. आवडीचे पदार्थ चाखाल.

वृषभ:- जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. साहित्याची आवड जोपासता येईल. भावंडांना बाहेर गावी जाण्याचं योग येईल. मैत्रीतील आपुलकी वाढेल. फार दूरचे विचार करू नका.

मिथुन:- क्षणिक सौख्याचा आनंद घ्याल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. कमिशनचा लाभ उठवावा.

कर्क:- स्त्री वर्गाचा सहवास लाभेल. नवीन मित्रा जोडले जातील. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल.

सिंह:- घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल. महिलावर्ग मनाजोगी खरेदी करेल. चांगले साहित्य वाचनात येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.

कन्या:- चारचौघांत तुमची कला सादर करता येईल. योग्य विचारांची जोड घ्यावी. धार्मिक साहित्य वाचाल. इतरांना मना पासून मदत कराल. मनात नवीन कल्पना रुजतील.

तूळ:- अचानक धनलाभ संभवतो. लॉटरीचे तिकीट घ्याल. घरगुती प्रश्न समजून घ्यावेत. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामे पूर्ण होतील.

वृश्चिक:- पत्नीचे प्रेमळ सौख्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. कामातून आत्मिक समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीचा मार्ग आखावा. मुलांचा खोडकरपणा वाढेल.

धनू:- कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. बोलण्याचा भरात नवीन जबाबदारी अंगावर घ्याल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल.

मकर:- पित्ताचा विकार जाणवेल. कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. स्वत: मध्ये काही बदल करून पहावेत. कामातील अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावेत.

कुंभ:- सामाजिक बांधीलकी जपावी. वादावादीत सहभाग घेऊ नका. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. धाडसाने कामे पूर्ण कराल. तुमची हिम्मत वाढीस लागेल.

मीन:- मित्रांचा रोष वाढवून घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर