25th May Panchang & Marathi Rashi Bhavishya: २५ मेला वैशाख कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. शनिवारच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत द्वितीया तिथी कायम राहील. २५ मे ला सकाळी १० वाजून ७ मिनिटांपर्यंत सिद्ध योग असणार आहे व त्यानंतर साध्य योग जुळून येईल. शनिवारी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र व त्यानंतर मूल नक्षत्र जागृत होईल. २५ मे नारद जयंती सुद्धा असणार आहे. एकूणच ग्रहमानानुसार १५ मेचा शनिवार तुमच्यासाठी कसा असेल हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-उगाचच चिडचिड कराल. कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन लोकांशी संपर्क होईल. नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील.

वृषभ:-सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. अति श्रमाचा ताण जाणवेल.

मिथुन:-लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. कामात चलबिचलता येईल. गप्पांच्या ओघात शब्द देताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात एकसूत्रता ठेवावी.

कर्क:-जवळचा प्रवास चांगला होईल. भावंडांचा सहवास लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवीन विषय आवडीने जाणून घ्याल. आवडता छंद जोपासाल.

सिंह:-गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक सौख्यात वेळ घालवाल. तरुण वर्गाशी जवळीक वाढेल. नवीन मित्र जोडाल. काही बाबीत तडजोड करावी लागेल.

कन्या:-दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. कमिशन मधून मिळणार्‍या फायद्याचा लाभ उठवा. धार्मिक कामातून मान वाढेल. वरिष्ठांना नाराज करू नका. पोटाची काळजी घ्यावी.

तूळ:-मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. मुलांवर बारीक लक्ष ठेवावे. राग अनावर होऊ देऊ नका. पत्नीचे मत मान्य करावे लागेल. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक:-कौटुंबिक शांतता जपावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत. जुनी कामे पूर्ण करता येतील. फार विचार करत बसू नका.

धनू:-कामातील उत्साह वाढवावा लागेल. मनातील शंका बाजूला साराव्यात. कौटुंबिक प्रश्न संयमाने हाताळा. प्रवासात सावधानता बाळगा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

मकर:-भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्याल. बोलताना सारासार विचार करावा. जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका. अकारण होणार्‍या खर्चाकडे लक्ष ठेवा. कामात सहकार्‍यांची साथ मिळेल.

कुंभ:-उगाच त्रागा करू नका. मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा. कचेरीची कामे अडकून राहतील. दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. घरात अधिकार वाणीने वागाल.

हे ही वाचा<< १२ महिन्यांनी लक्ष्मी नारायण येतायत घरी! ३१ मेपासून महिनाभरात ‘या’ राशींचे दिवस पालटणार; नशिबात प्रचंड धन, आरोग्य, प्रेम

मीन:-खर्चाचे प्रमाण वाढेल. बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. सामाजिक जाणीव जागृत ठेवावी. जवळचे नातेवाईक भेटतील. अधिकाराचा स्वबळावर वापर करावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25th may panchang marathi rashi bhavishya mesh to meen daily horoscope lakshmi blessing with shani on vaishakh dwitiya love money astrology svs
First published on: 24-05-2024 at 19:02 IST