Mercury Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रह पुन्हा एकदा मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश कारण्यासाठी सज्ज झाला आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या अत्यंत शुभ मुहुर्तावर बुधाचे मीन राशीतून गोचर होईल व १० मे ला म्हणजेच आज संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी बुधाचे राशी परिवर्तन पूर्ण होईल. या कालावधीत काही राशींना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल तर काहींची मौज होईल. २१ दिवस बुध याच राशीत राहून मग पुन्हा ३१ मेला दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी राशी परिवर्तन करणार आहेत. या कालावधीत मिथुन, कर्क सहित शनीच्या राशींना सुद्धा लाभाचे संकेत आहेत. बुध हा वैभव, चातुर्य, धन, प्रगतीचा कारक असल्याने या कालावधीत बुद्धिजीवींना विशेष लाभ होण्याची चिन्हे आहेत. त्यात तुमच्या राशीचा सुद्धा समावेश आहे का हे पाहूया..

पुढील २१ दिवस ‘या’ राशींची होणार चांदी; यश घालेल पायाशी लोटांगण

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करताच मिथुन राशीच्या मंडळींवर याचा शुभ प्रभाव दिसू लागली. या कालावधीत आपण एखादी मोठी गोष्ट कमवाल. त्या मानाने, धनाने आपले कुटुंबही खूप आनंदी होईल. अचानक माता लक्ष्मीच्या आगमनाने मनात थोडा संभ्रम असेल. पण बुधाची साथ बुद्धीला मिळाल्याने योग्य ती गुंतवणूक करण्याचा विचार कराल. खर्चाला आळा घालू नका पण गुंतवणुकीला प्राधान्य द्या. विद्यार्थ्यांसाठी पुढील २१ दिवस अगदी महत्त्वाचे असतील. अभ्यासात स्वतःहून रमून जाल. मेहनतीपासून पळू नका तरच हवे तसे फळ प्राप्त होईल.

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

बुध गोचर हे कर्क राशीच्या मान- सन्मानात, पद प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. एखाद्या नव्या कामाच्या सुरुवातीसाठी आजपासून चांगला मुहूर्त आहे. नोकरदारांना मनाप्रमाणे यश मिळू शकते. या कालावधीत तुम्हाला वाहन सुख मिळणार आहे. आपल्या करिअरला वेग मिळेल. नोकरीच्या नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही स्वतः नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. या काळात तुमच्या जुन्या मित्र मैत्रिणींच्या भेटी गाठी होऊ शकतात ज्यामुळे मन सुखावले जाईल.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

२१ दिवसात तूळ राशीच्या व्यक्ती करिअरमध्ये एखादे नवे पद प्राप्त करू शकतात. आपल्याला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. कामाच्या निमित्ताने प्रवास होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. पती- पत्नीच्या नात्यात गोडवा वाढेल. संतती प्राप्तीचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. प्रॉपर्टीची कामे सुद्धा मार्गी लागतील. वाडवडिलांच्या संपत्तीचा फायदा होऊ शकतो. अनपेक्षित लाभामुळे तुमचे जुने प्रश्न सुटतील. कर्जातून मुक्ती मिळेल. आध्यत्मिक गोष्टींमध्ये मन रमवाल.

हे ही वाचा<< अक्षय्य तृतीयेपासून ९ दिवस ‘या’ ३ राशींवर माता लक्ष्मी करणार धन वर्षाव; तुम्हीही १९ मे पर्यंत सोन्यासम आयुष्य जगाल

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

बुध ग्रहाचे गोचर आणि त्यात शनीचा शश योग सक्रिय असल्याने कुंभ राशीसाठी पुढील २१ दिवस लाभच लाभ अशी स्थिती असणार आहे. या कालावधीत विशेषतः कलाविश्वाशी निगडित लोकांना प्रचंड महत्त्वाच्या संधी मिळू शकतात. पगारवाढीचा सुद्धा संकेत आहे. व्यावसायिकांना सरकारी पाठबळ लाभू शकते. १० मे ते ३१ मे पर्यंतचा कालावधी तुमच्या संयमाची परीक्षा घेईल. मंगल कार्यात सहभाग घेता येईल. आरोग्याची काळजी घ्यावी. तुमचे मनसुबे पूर्ण झाल्याने मानसिक ताण कमी असेल पण शारीरिक श्रम करावे लागतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)