Budh nakshatra gochar 2025: ग्रहांचे राजकुमार बुध ने २५ जून रोजी सकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी पुष्य नक्षत्रामध्ये गोचर केला आहे आणि ६ जुलैपर्यंत याच नक्षत्रामध्ये विराजमान राहणार आहे. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनि आहे. बुध ग्रहाला वाणी, व्यवसाय आणि बुद्धीचा कारक मानले जाते. बुध ग्रहाचे पुष्य नक्षत्रात आल्याने काही राशींच्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी आणि करिअरमध्ये वाढ दिसू शकते. या दरम्यान काही राशींच्या लोकांना व्यवसायात नफा मिळू शकतो. जाणून घेऊ या पुष्य नक्षत्र गोचरमुळे कोणत्या राशींना चांगले परिणाम दिसून येईल.
वृषभ राशी – बुध ग्रहाच्या पुष्य नक्षत्र गोचरमुळे वृषभ राशीच्या लोकांना वित्त व व्यवसायात लाभ मिळू शकतो. या दरम्यान हे लोक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. व्यवसायात वाढ दिसून येईल. हा काळ अत्यंत शुभ असेल. धनसंपत्तीचे आगमन होईल. नोकरीमध्ये आपली क्षमता दाखवण्याची संधी समोर येऊ शकते.
तुळ राशी – तुळ राशीच्या लोकांसाठी बुध नक्षत्र गोचर लाभदायक ठरू शकतो. या दरम्यान आपण सामाजिक मान प्रतिष्ठामध्ये वृद्धी होऊ शकते. अडकलेले कामे पूर्ण होऊ शकतात. कार्यस्थळी वरिष्ठांचे सहकार्य लाभू शकते. तुमच्या कामाचे कौतुक केले जाऊ शकते. नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते.
कन्या राशी – कन्या राशीच्या लोकांसाठी बुधचे शनि नक्षत्रामध्ये गोचर शुभ ठरणार आहे. या दरम्यान या लोकांना कार्यस्थळी नवीन जबाबदारी मिळू शकते. या लोकांना व्यवसायात पार्टनरशिपपासून लाभ मिळू शकतो. हे लोक वैयक्तित व व्यावसायिक आयुष्यात समतोल राखणार. नातेसंबंध दृढ होईल
मकर राशी – मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे पुष्य नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकता. या दरम्यान या लोकांचे प्लान यशस्वी होऊ शकतात. व्यवसायात या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. या लोकांच्या बँक बॅलेन्समध्ये वृद्धी होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ खास असणार आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)