Datta Jayanti Vishesh Rashi Bhavishya : १४ डिसेंबर २०२४ हा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी दुपारी ४ वाजून ५९ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल, त्यानंतर साध्य योग राहील. तसेच रात्री ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत रोहिणी नक्षत्र जागृत असेल.राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

याशिवाय आज दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात दत्त जयंती अत्यंत शुभ मानली जाते. दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्रीदत्तात्रेयसह लक्ष्मी-नारायणाची पूजा केली जाते. तर मेष ते मीनपैकी कोणाच्या धनसंपत्तीत होणार वाढ आणि कोणाच्या कर्तृत्वाला मिळेल भाव हे आपण जाणून घेऊया…

१४ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल.

वृषभ:- मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी.

मिथुन:- स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.

कर्क:- उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आवडीवर खर्च कराल.

सिंह:- आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका.

कन्या:- मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल.

तूळ:- जवळची व्यक्ति भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल.

वृश्चिक:- कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

धनू:- अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल.

मकर:- जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो.

कुंभ:- जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन:- व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर