मेष:-

आजचा दिवस तुमच्यासाठी विचारशील असेल. कर्ज घेण्याचा विचार आत्ता करू नका. आज मित्रांची साथ मिळेल. पत्नीच्या बाजूने चांगली साथ मिळेल. आज नशीबाची चांगली साथ मिळेल.

वृषभ:-

आजचा दिवस व्यस्त असेल. महत्त्वाचा निर्णय आज घेऊ शकाल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. आज समारंभासाठी आमंत्रण येईल. आज धावपळीमुळे थकवा जाणवेल.

मिथुन:-

अनावश्यक खर्च केला जाईल. सामाजिक कामात अडथळा येऊ शकतो. देवावरील विश्वास दृढ होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील.

कर्क:-

आजचा दिवस चांगला जाईल. मेहनतीचे गोड मिळेल. मुलांवरील विश्वास दृढ होईल. दिखाव्यासाठी पैसे खर्च कराल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल.

सिंह:-

आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. बोलण्यात गोडवा असावा. डोळ्यांशी निगडीत अडचण दूर होईल. इतरांशी असणारे संबंध जपावेत.

कन्या:-

आजचा दिवस सुखद असेल. हातातील कामे न डगमगता कराल. वडीलांचे सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. लोक तुमच्याविषयी गैरसमज करून घेऊ शकतात.

तूळ:-

आजचा दिवस शुभ असेल. तुम्हाला मनाजोगी फळे मिळतील. नात्यात गोडवा निर्माण होईल. इतरांच्या आनंदाचा विचार कराल. सांपत्तिक स्थिती सुधारेल.

वृश्चिक:-

मन काही कारणाने व्याकूळ होऊ शकते. व्यावसायिक प्रश्न सोडवता येतील. हितशत्रूंवर जय मिळवाल. संयमाने सर्व गोष्टी साध्य करता येतील. अडकलेली कार्यालयीन कामे पूर्ण होतील.  

धनू:-

दिवस चांगला जाईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. आवड जोपासता येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोटाचे विकार जाणवतील. आहारवर संयम ठेवा.

मकर:-

मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नावडते लोक सामोरे येतील. नातेवाईक तुमचा आदर करतील. सहकारी तुमच्या मताशी सहमत होतील. नवीन कामात गुंतवणूक कराल.

कुंभ:-

नशीबाची साथ मिळेल. केलेला खर्च फायदेशीर ठरेल. कोणावरही अति विश्वास ठेवू नका. नोकरांचे सुखं लाभेल. जवळचा प्रवास घडेल.

मीन:-

मुलांशी मतभेद संभवतात. आनंदी लोकांचा सहवास लाभेल. वाहवत जाऊ नका. सामाजिक सन्मानात वाढ होईल. तुमचे मनोबल वाढेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर