भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. गणेश उत्सव १० दिवस साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव संपतो आणि या दिवशी गणेशाचे विसर्जन होते. या तिथीला अनंत चतुर्दशी म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी ९ सप्टेंबर २०२२ ला अनंत चतुर्दशी आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे सर्व दिवस गणपतीला समर्पित असतात.

या दहा दिवसांत भक्तगण गणपती बाप्पाच्या विविध रूपांची पूजा करतात. गणपतीला भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा देव मानले जाते. गणेशाची पूजा केल्याने आपल्याला देवी पार्वती, भगवान शिव आणि लक्ष्मीजी यांचाही आशीर्वाद मिळतो. शास्त्रात गणेशाला आद्य देवता मानले जाते. यासोबतच त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात. तो बुद्धी दाता आहे. त्याची पूजा केल्याने अशुभ ग्रह केतू आणि बुद्धी व व्यापाराचा ग्रह बुध शांती प्रदान करतात, असे म्हटले जाते.

Lakshmi Narayan Yog : सप्टेंबर महिन्यात तयार होणार ‘लक्ष्मी नारायण योग’; ‘या’ राशींच्या लोकांच्या धनसंपत्तीमध्ये होणार अमाप वाढ

  • केतू

ज्योतिषशास्त्रात केतूला अशुभ ग्रहाच्या श्रेणीत ठेवले आहे. या ग्रहामुळे कुंडलीत अनेक अशुभ योगही तयार होतात. राहू आणि केतूमुळे कुंडलीमध्ये काल सर्प दोष, चांडाल योग, पितृ दोष, जाततत्व योग इत्यादी योग तयार होतात असे म्हणतात. या गोष्टी माणसाला आयुष्यभर त्रास देतात. यामुळे माणसाला पूर्ण यश मिळत नाही. तसेच, कामात अडथळे, त्रास किंवा आयुष्यात अनेक संकटे येतात. म्हणूनच ग्रहाला शांत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. गणेशोत्सवात श्रीगणेशाची आराधना केल्याने केतू ग्रहाची अशुभता दूर होऊ शकते. असे मानले जाते की श्रीगणेशाची उपासना केल्यास केतू शुभ फळ देते.

  • बुध

गणेशाची आराधना केल्याने बुध ग्रहालाही शांती मिळते. जर हा ग्रह अशुभ फल देत असेल तर श्रीगणेशाची उपासना केल्याने शुभ फळ मिळते. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यवसायाचा देव आणि संरक्षक मानले जाते. यासोबतच बुध हा गणित, त्वचा, लेखन, वाणी इत्यादींचा कारक मानला जातो. गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने आणि मंत्र जप केल्याने बुध ग्रहाला शांती मिळते, असे म्हणतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)