Makar Sankranti 2025 Puja Time and Significance: हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होते आणि शुभ व मांगलिक कार्यांची सुरुवात होते. तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात आहे. दरवर्षी हा सण १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. यंदाची मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. महाराष्ट्रामध्ये हा सण विवाहित महिलांसाठी खूप खास मानला जातो. तसेच या दिवशी सूर्यदेवाची पूजा-आराधना केली जाते, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक राज्यांत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

मकर संक्रांतीची तारीख, पुण्य काळ

यंदाची मकर संक्रांत गुरुवार, १४ जानेवारी रोजी आहे. या दिवशी सूर्य सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल.

पंचांगानुसार, मकर संक्रांतीचा पुण्य काळ सकाळी ९ वाजून ०३ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील. तसेच महापुण्य काळ सकाळी ९ वाजून ०३ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत असेल.

मकर संक्रांतीचा इतिहास

पौराणिक कथेनुसार विविध कथा सांगितल्या जातात. त्यातील एका कथेनुसार, शंकरासूर नावाच्या राक्षसाचा देवी संक्रांतीने वध केला होता, त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने राक्षस किंकरासुरचा वध केला होता, त्यामुळे या दिवसाला किंक्रात म्हटले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा: राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख

मकर संक्रांतीचे महत्त्व

  • मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व सांगितले जाते. या दिवशी नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो.
  • या दिवशी भारतातील अनेक तीर्थस्थानांवर लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
  • तसेच या दिवशी सूर्याला अर्ध्य देतात. या दिवशी सूर्याची उपासना, स्नान-दानाचेदेखील विशेष महत्त्व आहे.
  • संक्रांतीच्या शुभ दिवशी गरजू लोकांना काळे तीळ, चादर, गूळ, तूप या वस्तू दान करण्याचे महत्त्व आहे.