Rahu Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये राहुला असा ग्रह मानला जातो की जो नेहमी लोकांच्या जीवनात रहस्यमय प्रकारे येतो. ज्योतिषशास्त्रामध्ये राहुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राहु नेहमी उलट चाल चालत आहे आणि जवळपास १८ महिन्यांपर्यंत एकाच राशीमध्ये विराजमान राहणार आहे. पंचागनुसार, या वेळी राहु मीन राशीमध्ये विराजमान आहे पण १८ मे २०२५ ला कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. जाणून घेऊ यामुळे कोणत्या राशींवर परिणाम दिसून येईल. (rahu gochar three zodiac signs will have to face financial problems due to ill effect of rahu)

वृषभ राशी (Vrishabh Rashi)

राहुचा कुंभ राशीमध्ये प्रवेश केल्याने वृषभ राशीच्या लोकांमध्ये तणाव वाढू शकतो. या दरम्यान वृषभ राशीच्या लोकांमध्ये रागीटपणा दिसून येईल. त्यांना अस्वस्थता जाणवू शकते. या दरम्यान असं काही घडू शकते ज्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो. या लोकांचा खर्चही वाढू शकतो. यांची नोकरीच्या ठिकाणी होणारी प्रगती थांबू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना तोट्याचा सामना करावा लागू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांना अभ्यासात रस नसेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात ज्यामुळे कुटुंबात तणाव जाणवू शकतो.

mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार

हेही वाचा : ७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ

कर्क राशि (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांवर राहुचा कुंभराशीमध्ये प्रवेश नकारात्मक ठरू शकतो. या दरम्यान या लोकांच्या कामांमध्ये अडचणी वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात मतभेदाची स्थिती निर्माण होऊ शकते. या वेळी या राशींना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या समस्या यांना जाणवू शकतात. कोणताही व्यव्हार करताना काळजी घ्यावी. वादविवादापासून दूर राहावे.

हेही वाचा : ४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

u

मीन राशी (Meen Rashi)

राहुचा हा गोचर मीन राशीच्या लोकांसाठी चांगला नाही. या दरम्यान या लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता जाणवू शकते. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. या वेळी खर्चांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. कारण अचानक खर्च वाढू शकतो ज्यामुळे आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनात जवळच्या लोकांकडून फसवणूक होऊ शकते. डोकेदुखी किंवा झोपेच्या समस्या वाढू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader